भाजी विक्रेत्याने गुंतवले साडेचार कोटी भाजी विक्रेत्याने गुंतवले साडेचार कोटी टोरेस प्रकरणातील फिर्यादी प्रदीप वैश्य (वय ३१) दादर येथील घाउक भाजी विक्रेते आहेत. त्यांनी या कंपनीत स्वतःसह अन्य ४४ नातेवाईक, मित्र परिवाराच्या नावे मे ते डिसेंबर या कालावधीत तब्बल साडेचार कोटी रुपये गुंतवल्याचा दावा केला. तसेच त्यांनी दिलेल्या माहिती आधारे अन्य ३७ व्यक्तींना या योजनेत साडेआठ कोटी रुपये गुंतल्याचे पोलिसांनी सांगितले. परतावाही गुंतवला फिर्यादी वैश्य यांच्यासह बहुतांश गुंतवणुकदारांनी आठवड्याला मिळणारा पाच ते सहा टक्के परतावा न स्वीकारता पुन्हा या योजनेत गुंतवला होता. त्यामुळे बहुतांश गुंतवणुकदारांची मुद्दल आणि परताव्याच्या रक्कमेचा आकडा फुगला. सानपाडा लुटीचा बनाव सानपाडा येथील शो रूममध्ये झालेली लूट आणि त्यांनतर गुंतवणुकदारांना पाठवण्यात आलेले संदेश हा कंपनीनेच रचलेला बनाव आहे, असा संशय पोलिस व्यक्त करतात. कंपनीचा सीईओ तौफिक आणि सीए गुप्ता यांनी सुमारे शंभर व्यक्तींना हाताशी धरत सानपाडा येथील शोरूममध्ये लुटमार केली. त्याचे सीसीटिव्ही चित्रण आणि त्या दोघांपासून सावध राहण्याची सूचना कंपनीकरवी गुंतवणुकदारांना देण्यात आली. प्रत्यक्षात या लुटीचे निमित्त करून गुंतवणुकदारांना काही काळ गुंतवून ठेवत पळून जाण्यास मोकळा वेळ मिळावा, असा पूर्वनियोजित कट असावा, असा संशय प्राथमिक तपासातून पुढे येत आहे. ७२ तासांच्या वायद्याने संभ्रम टोरेसतर्फे मंगळवारी (ता.७) ७२ तासांत पैसे परत करू, अशा आशयाचे लघुसंदेश काही गुंतवणुकदारांना प्राप्त झाले. तसेच या संदेशात सर्व गडबडीस सीईओ तौफिक आणि सीए गुप्ता जबाबदार असल्याचे नमूद होते. त्यामुळे पोलिस मंगळवारी शिवाजीपार्क पोलिस ठाण्याबाहेर जमलेल्या गुंतवणुकदारांच्या गर्दीत तक्रार करावी की वाट पहावी असा संभ्रम दिसून आला. डायलीसीस, बायपासचे पैसे गमावले शिवाजी पार्क पोलिस ठाण्याबाहेर जमलेल्या हवालदिल गुंतवणुकदारांच्या भरघोस परतावा मिळवण्याची हाव कशी महागात पडली, याच्या नानाविध कर्मकहाण्या उघड होत होत्या. कोणी म्हाताऱ्या आई- वडिलांच्या उपचार, शस्त्रक्रियांसाठी केलेली आर्थिक तजवीज टोरेसमध्ये गुंतवली. कोणी घर गहाण टाकले, कोणी दागिने विकले. कोणी सावकारी कर्ज काढले. सर्वाधिक पंचाईत झाली ती १० ते २० टक्के कमिशनच्या नादात स्वतःसोबत इतरांना विशेषतः नातेवाईक, मित्र परिवारास गुंतवणुकीस भाग पाडणाऱ्यांची. या गर्दीत कोणी शंभरहून अधिक, कोणी ६० तर कोणी ७० सदस्य जोडले आहेत. आता ती मंडळी या व्यक्तीवर दोषाचे खापर फोडत आहेत.

भाजी विक्रेत्याने गुंतवले साडेचार कोटी

भाजी विक्रेत्याने गुंतवले साडेचार कोटी
टोरेस प्रकरणातील फिर्यादी प्रदीप वैश्य (वय ३१) दादर येथील घाउक भाजी विक्रेते आहेत. त्यांनी या कंपनीत स्वतःसह अन्य ४४ नातेवाईक, मित्र परिवाराच्या नावे मे ते डिसेंबर या कालावधीत तब्बल साडेचार कोटी रुपये गुंतवल्याचा दावा केला. तसेच त्यांनी दिलेल्या माहिती आधारे अन्य ३७ व्यक्तींना या योजनेत साडेआठ कोटी रुपये गुंतल्याचे पोलिसांनी सांगितले.

परतावाही गुंतवला
फिर्यादी वैश्य यांच्यासह बहुतांश गुंतवणुकदारांनी आठवड्याला मिळणारा पाच ते सहा टक्के परतावा न स्वीकारता पुन्हा या योजनेत गुंतवला होता. त्यामुळे बहुतांश गुंतवणुकदारांची मुद्दल आणि परताव्याच्या रक्कमेचा आकडा फुगला.

सानपाडा लुटीचा बनाव
सानपाडा येथील शो रूममध्ये झालेली लूट आणि त्यांनतर गुंतवणुकदारांना पाठवण्यात आलेले संदेश हा कंपनीनेच रचलेला बनाव आहे, असा संशय पोलिस व्यक्त करतात. कंपनीचा सीईओ तौफिक आणि सीए गुप्ता यांनी सुमारे शंभर व्यक्तींना हाताशी धरत सानपाडा येथील शोरूममध्ये लुटमार केली. त्याचे सीसीटिव्ही चित्रण आणि त्या दोघांपासून सावध राहण्याची सूचना कंपनीकरवी गुंतवणुकदारांना देण्यात आली. प्रत्यक्षात या लुटीचे निमित्त करून गुंतवणुकदारांना काही काळ गुंतवून ठेवत पळून जाण्यास मोकळा वेळ मिळावा, असा पूर्वनियोजित कट असावा, असा संशय प्राथमिक तपासातून पुढे येत आहे. 

७२ तासांच्या वायद्याने संभ्रम
टोरेसतर्फे मंगळवारी (ता.७) ७२ तासांत पैसे परत करू, अशा आशयाचे लघुसंदेश काही गुंतवणुकदारांना प्राप्त झाले. तसेच या संदेशात सर्व गडबडीस सीईओ तौफिक आणि सीए गुप्ता जबाबदार असल्याचे नमूद होते. त्यामुळे पोलिस मंगळवारी शिवाजीपार्क पोलिस ठाण्याबाहेर जमलेल्या गुंतवणुकदारांच्या गर्दीत तक्रार करावी की वाट पहावी असा संभ्रम दिसून आला.

डायलीसीस, बायपासचे पैसे गमावले
शिवाजी पार्क पोलिस ठाण्याबाहेर जमलेल्या हवालदिल गुंतवणुकदारांच्या भरघोस परतावा मिळवण्याची हाव कशी महागात पडली, याच्या नानाविध कर्मकहाण्या उघड होत होत्या. कोणी म्हाताऱ्या आई- वडिलांच्या उपचार, शस्त्रक्रियांसाठी केलेली आर्थिक तजवीज टोरेसमध्ये गुंतवली. कोणी घर गहाण टाकले, कोणी दागिने विकले. कोणी सावकारी कर्ज काढले. सर्वाधिक पंचाईत झाली ती १० ते २० टक्के कमिशनच्या नादात स्वतःसोबत इतरांना विशेषतः नातेवाईक, मित्र परिवारास गुंतवणुकीस भाग पाडणाऱ्यांची. या गर्दीत कोणी शंभरहून अधिक, कोणी ६० तर कोणी ७० सदस्य जोडले आहेत. आता ती मंडळी या व्यक्तीवर दोषाचे खापर फोडत आहेत.
Published on

भाजीविक्रेत्याने गुंतवले साडेचार कोटी
टोरेस प्रकरणातील फिर्यादी प्रदीप वैश्य (वय ३१) दादर येथील घाऊक भाजीविक्रेते आहेत. त्यांनी या कंपनीत स्वतःसह अन्य ४४ नातेवाईक, मित्रपरिवाराच्या नावे मे ते डिसेंबर या कालावधीत तब्बल साडेचार कोटी रुपये गुंतवल्याचा दावा केला. तसेच त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे अन्य ३७ व्यक्तींनी या योजनेत साडेआठ कोटी रुपये गुंतवल्याचे पोलिसांनी सांगितले.

परतावाही गुंतवला
फिर्यादी वैश्य यांच्यासह बहुतांश गुंतवणूकदारांनी आठवड्याला मिळणारा पाच ते सहा टक्के परतावा न स्वीकारता पुन्हा या योजनेत गुंतवला होता. त्यामुळे बहुतांश गुंतवणूकदारांची मुद्दल आणि परताव्याच्या रकमेचा आकडा फुगला.

सानपाडा लुटीचा बनाव
सानपाडा येथील शोरूममध्ये झालेली लूट आणि त्यानंतर गुंतवणूकदारांना पाठवण्यात आलेले संदेश हा कंपनीनेच रचलेला बनाव आहे, असा संशय पोलिस व्यक्त करतात. कंपनीचा सीईओ तौफिक आणि सीए गुप्ता यांनी सुमारे शंभर व्यक्तींना हाताशी धरत सानपाडा येथील शोरूममध्ये लूटमार केली. त्याचे सीसीटीव्ही चित्रण आणि त्या दोघांपासून सावध राहण्याची सूचना कंपनीकरवी गुंतवणूकदारांना देण्यात आली. प्रत्यक्षात या लुटीचे निमित्त करून गुंतवणूकदारांना काही काळ गुंतवून ठेवत पळून जाण्यास मोकळा वेळ मिळावा, असा पूर्वनियोजित कट असावा, असा संशय प्राथमिक तपासातून पुढे येत आहे.

७२ तासांच्या वायद्याने संभ्रम
टोरेसतर्फे मंगळवारी (ता. ७) ७२ तासांत पैसे परत करू, अशा आशयाचे लघुसंदेश काही गुंतवणूकदारांना प्राप्त झाले. तसेच या संदेशात सर्व गडबडीस सीईओ तौफिक आणि सीए गुप्ता जबाबदार असल्याचे नमूद होते. त्यामुळे मंगळवारी शिवाजी पार्क पोलिस ठाण्याबाहेर जमलेल्या गुंतवणूकदारांच्या गर्दीत तक्रार करावी की वाट पाहावी, असा संभ्रम दिसून आला.

डायलीसीस, बायपासचे पैसे गमावले
शिवाजी पार्क पोलिस ठाण्याबाहेर जमलेल्या हवालदिल गुंतवणूकदारांची भरघोस परतावा मिळवण्याची हाव कशी महागात पडली, याच्या नानाविध कर्मकहाण्या उघड होत होत्या. कोणी आई-वडिलांच्या उपचार, शस्त्रक्रियांसाठी केलेली आर्थिक तजवीज टोरेसमध्ये गुंतवली. कोणी घर गहाण टाकले, कोणी दागिने विकले, कोणी सावकारी कर्ज काढले. सर्वाधिक पंचाईत झाली ती १० ते २० टक्के कमिशनच्या नादात स्वतःसोबत इतरांना विशेषतः नातेवाईक, मित्रपरिवारास गुंतवणुकीस भाग पाडणाऱ्यांची. या गर्दीत कोणी शंभरहून अधिक, कोणी ६० तर कोणी ७० सदस्य जोडले आहेत. आता ती मंडळी या व्यक्तीवर दोषाचे खापर फोडत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com