अल्पसंख्याकांवरील हल्लेखोरांना शिक्षा होत नाही

अल्पसंख्याकांवरील हल्लेखोरांना शिक्षा होत नाही

Published on

अल्पसंख्याकांवरील हल्लेखोरांना शिक्षा होत नाही
विचारवंत प्रा. थॉमस हॅन्सन यांची खंत

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : सार्वजनिक जीवनात पोलिस आणि सुरक्षा दलांद्वारे सामान्य नागरिकांवर अत्याचार होत असताना किंवा अल्पसंख्याकांवर मोठ्या प्रमाणात हल्ले होत असताना हल्लेखोरांना शिक्षा होत नाही, अशी खंत प्रख्यात विचारवंत आणि लेखक प्रा. थॉमस ब्लॉम हॅन्सन यांनी व्यक्त केली.

सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलॅरिझमच्या वतीने २५व्या डॉ. असगर अली इंजिनिअर स्मृती व्याख्यान आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील अंजुमन इस्लाम महाविद्यालयात आयोजित केले होते. ‘हिंसा आणि लोकशाही : भारतीय सार्वजनिक जीवनात मुक्तता आणि संरक्षण’ या ज्वलंत विषयावर प्रा. थॉमस ब्लॉम हॅन्सन बोलत होते. अर्थतज्ज्ञ आणि माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
प्रा. थॉमस हॅन्सन पुढे म्हणाले, की भारतीय सार्वजनिक जीवन दडपणाखाली आहे. आज बहुतेक भारतीय राजकीय शक्तीला मनमानी पद्धतीच्या कारवाईपासून संरक्षण मिळते. मालमत्ता आणि सुरक्षितता मिळते. त्यालाही संरक्षण मिळते. त्यातून सामाजिक आणि धार्मिक अल्पसंख्याक यांच्यात असुरक्षितेची भावना निर्माण होते, असे मत त्यांनी नोंदवले.

आपल्या सार्वजनिक जीवनाचा गैरवापर होत आहे, त्याचा हिंसेसाठी वापर होत आहे. सामान्य माणूस असुरक्षित होत आहे. अल्पसंख्याकांवर हल्ले होत आहेत. हल्लेखोरांना शिक्षा होत नाही, ही परिस्थिती चिंताजनक आहे, असे स्पष्ट करून त्यांनी जर्मनीतील नाझीवादाचा संदर्भ दिला.
----
डॉ. मुणगेकर यांच्याकडून चिंता
लोकशाही आणि तिच्या संस्थांसमोर देशात एक आव्हान निर्माण झाले असल्याबद्दल डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी चिंता व्यक्त केली. लोकशाहीत या घटनात्मक संस्था टिकल्या पाहिजेत. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत डॉ. मुणगेकर यांनी व्यक्त केले.
सीएसएस संचालक इरफान इंजिनियर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com