

बँक ऑफ बडोदाचा स्त्रियांसाठी शक्ती समृद्धी उपक्रम
मुंबई, ता. १३ : बँक ऑफ बडोदाच्या बॉबकार्ड लि.तर्फे महिला सक्षमीकरणासाठी शक्ती समृद्धी हा उपक्रम सुरू केला असून, त्याद्वारे पहिल्या टप्प्यात दीडशे महिला उद्योजकांना सहाय्य केले जाईल. युनायटेड वे मुंबईच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत असून त्यात शिलाई यंत्रे, बेकिंग उपकरणे आणि इतर आवश्यक साधनांसह उद्योजकता किट वितरित केले जाईल. लाभार्थ्यांना त्यांचे व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी सहाय्य केले जाईल. याखेरीज कौशल्य विकास आणि वित्तीय साक्षरता प्रशिक्षणही दिले जाईल. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला राज्याच्या महिला आणि बालविकासमंत्री आदिती तटकरे हजर होत्या.
या उपक्रमात महिलांना शिक्षण, मार्गदर्शन देऊन उद्योजकतेच्या संधी वाढवल्या जातील आणि त्यांच्या व्यावसायिक क्षमता बळकट केल्या जातील. तसेच महिला खेळाडू आणि पॅराऑलिंपियन यांनादेखील सहाय्य केले जाईल. राज्यातील महिला उद्योगजकांसाठी आपण सर्वांनी गतिमान आणि सर्वसमावेशक परिसंस्था निर्माण करूया, असे आवाहन आदिती तटकरे यांनी केले.
महिलांसाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण
शक्ती समृद्धी उपक्रमाद्वारे तळागाळातील महिलांचे सक्षमीकरण होऊन कुटुंब, समुदाय आणि समाज समृद्ध होईल, असे बॉबकार्डचे एमडी रवींद्र राय म्हणाले. या उपक्रमात महिलांना तीन दिवसांचे उद्योजकता विकास प्रशिक्षण दिले जाईल. त्यात व्यवसाय कौशल्य, उद्योजकता, वैयक्तिक आर्थिक व्यवस्थापन आदींचे शिक्षण दिले जाईल. त्यांना उद्योजकता कीट दिल्यानंतर सतत मार्गदर्शन, नियमित तपासणी आणि समस्या सोडवण्याची सत्रे घेतली जातील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.