गेल्या सहा वर्षांत बालकांमध्ये कर्करोग वाढला
गेल्या सहा वर्षांत बालकांमध्ये कर्करोग वाढला
३० टक्के मुलांना पुन्हा कर्करोगाचा धोका
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मुंबईत कर्करोगाचे प्रमाण वाढत असताना लहान मुलांमध्येही कर्करोगाचा वाढता धोका आहे. मुंबईच्या परळ येथील टाटा व अक्ट्रेक रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, दरवर्षी लहान मुलांना होणारा कर्करोग वाढत आहे. २०२३ या वर्षात तीन ते १५ या वयोगटातील २ हजार ५९ मुलांमध्ये कर्करोगाची नोंद करण्यात आली. २०२४मध्ये हे प्रमाण किंचित वाढले असून, एकूण २ हजार १३१ एवढे बाल रुग्ण नोंदले गेले.
बालरुग्णांना होणाऱ्या कर्करोगाविषयी जनजागृती व्हावी, यासाठी दरवर्षी १५ फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग निवारण दिन साजरा केला जातो. या दिवशी कर्करोगाशी संबंधित समज-गैरसमज आणि जागरूकता केली जाते. कर्करोगाची लक्षणे दिसल्यास तातडीने उपचार घेणे गरजेचे असल्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. सध्या कर्करोगासंबंधित जनजागृती वाढल्याने पालक तत्काळ उपचार सुरू करतात. शिवाय नागरिकांना त्यांच्या घराजवळ उपचार मिळत असल्याने रुग्णसंख्या नोंदवली जाते. शिवाय योग्यरीत्या उपचारही मिळतात. नवनव्या तंत्रज्ञानामुळे उपचार सहज आणि सोपा झाला आहे.
प्रौढ आणि लहान मुलांच्या कर्करोगात फरक
लहान आणि मोठ्या मुलांमध्ये होणाऱ्या कर्करोगामध्ये फरक असतो. त्यामुळे बालक आणि प्रौढ माणसांना होणाऱ्या कर्करोगाच्या प्रकारात बदल असतात. त्यांच्या उपचार पद्धतीमध्येही फरक असतो.
लहान मुलांना होणारे कर्करोग
लहान मुलांमध्ये ल्यूकिमिया म्हणजे रक्ताचा कर्करोग, ब्रेन किंवा स्पाइनल कॉर्ड ट्यूमर, न्यूरोब्लास्टोमा, विल्म्स ट्यूमर, लिम्फोमा आणि रेटिनोब्लास्टोमा (डोळ्याचा कर्करोग) असे कर्करोगाचे प्रकार आढळतात. लहान मुलांमध्ये कर्करोग होण्याचे प्रमाण जास्त असले तरी योग्यवेळी त्याविषयी माहिती मिळाली व योग्यवेळी उपाय केल्यास ८० टक्के कर्करोग बरा होऊ शकतो, असे तज्ज्ञ सांगतात.
सहा वर्षांचा आलेख
गेल्या सहा वर्षांत टाटा व अक्ट्रेक या टाटाच्या खारघर येथील रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, २०१९ मध्ये २ हजार ८९ बालकांना कर्करोग झाल्याचे समोर आले. तर २०२०मध्ये १ हजार १९९, २०२१मध्ये १ हजार ७८७, २०२२मध्ये २ हजार ११०, २०२३मध्ये २ हजार ५९ आणि २०२४मध्ये २ हजार १३१ बालकांना कर्करोग झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मुलांमध्ये सर्वाधिक आढळणाऱ्या कर्करोगात ल्युकेमियाचे प्रमाण २५ टक्के, ब्रेन ट्यूमरचे २५ टक्के, लिम्फोमाचे २० टक्के, हाडांचे ट्यूमर १० टक्के आणि इतर ट्यूमरचे प्रमाण २० टक्के आहे. यासह ३० टक्के मुलांना पुन्हा कर्करोग होण्याचा धोका असतो.
पालकांनी लक्षणे ओळखा
दीर्घ काळ ताप, अशक्तपणा, जखमेतून अधिक काळ रक्त येणे, शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी गाठी येणे, डोकेदुखीमुळे उल्टी होणे, नजर कमी होणे, वजनात घट, शरीरावर लाल रंगाचे चट्टे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

