आरोग्य सेविकांवर जबरदस्तीने ‘आयुष्मान’चे काम लादू नये

आरोग्य सेविकांवर जबरदस्तीने ‘आयुष्मान’चे काम लादू नये

Published on

आरोग्यसेविकांवर जबरदस्तीने ‘आयुष्मान’चे काम लादू नये!

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मुंबईत काम करणाऱ्या आरोग्य आणि आशा कार्यकर्त्यांना महापालिका कामांचा भार देत आहे, असा आरोप करत महापालिका आरोग्यसेवा कर्मचारी संघटनेने महापालिकेचा आरोग्य विभागच आरोग्य कर्मचाऱ्यांना इतर क्षेत्रात काम करायला लावत असल्याचे म्हटले आहे. महापालिकेच्या या वृत्तीच्या विरोधात आशा व आरोग्यसेवकांनी आपल्या संघटनेच्या माध्यमातून कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांच्याकडे निवेदन देऊन त्यांना असे काम करायला लावू नये, अशी विनंती केली आहे.
मुंबई महापालिका क्षेत्रात ३,५०० आरोग्य कर्मचारी आणि सुमारे १,५०० आशा कार्यकर्त्या कार्यरत आहेत. मुंबईत, आशा आणि आरोग्यसेवक स्थानिक आरोग्य केंद्रांद्वारे गरीब महिलांना आरोग्यसेवा देतात. यासोबतच लसीकरण, प्रसूतीपूर्व काळजी, कुटुंब नियोजन, आरोग्य पद्धतींबद्दल शिक्षित करणे, मोठ्या भौगोलिक भागात भेट देऊन आरोग्यसेवा पुरवणे हे त्यांच्या प्रमुख कामांचा समावेश आहे, मात्र गेल्या काही महिन्यांपासून कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर इतर कामेही सोपवली जात आहेत. यामुळे आशा आणि आरोग्य कर्मचारी पूर्णपणे त्रस्त आहेत. या त्रासाला कंटाळून पालिका आरोग्यसेवा कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून महापालिका आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात त्यांनी आयुष्मान कार्डसाठी सुरू केलेले ऑनलाइन काम करण्याची सक्ती करू नये, असे आवाहन केले आहे. ‘आशा आणि आरोग्यसेवकांवर काम बळजबरीने करायला लादू नये, अशी मागणी केल्याचे संघटनेचे अध्यक्ष प्रकाश देवदास यांनी म्हटले आहे.
...
मोबाईलवर अडचणी
मोबाईलमध्ये ऑनलाइन कार्ड तयार करताना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे त्यांना मोबाईल फोन देण्यात आलेला नाही. काम करताना त्यांचाच मोबाईल होतो. क्षमतेअभावी मोबाईल बंद पडत आहे. अनेक भागात इंटरनेट नीट काम करत नसल्यामुळे ओटीपी लवकर मिळत नाही. यामुळे लाभार्थी नाराज होतो.
...
कर्मचाऱ्यांकडे जुने मोबाईल
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १९९०पासून सेवा देणाऱ्या सुमारे १,५०० आरोग्य कर्मचाऱ्यांकडे फारसे शिक्षण नाही. त्यांच्याकडे जुना मोबाईल आहे. अशा स्थितीत त्यांना ऑनलाइन कामात प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com