कोस्टल रोडच्या मोकळ्या जागेवर मैदाने तयार करा : लोढा

कोस्टल रोडच्या मोकळ्या जागेवर 
मैदाने तयार करा : लोढा
Published on

कोस्टल रोडच्या मोकळ्या जागेवर
मैदाने तयार करा : मंगलप्रभात लोढा
मुंबई, ता. १६ : कोस्टल रोडच्या मोकळ्या जागेवर खेळाची मैदाने तयार करण्याची मागणी मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
कोस्टल रोड प्रकल्पाला मंजुरी मिळवताना पर्यावरण नियमांनुसार जवळपास २०० एकर जागा खुली ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर, त्या जागेपैकी ५० एकर जागा खेळाच्या मैदानासाठी राखीव ठेवावी, अशी मागणी लोढा यांनी या पत्राद्वारे केली आहे.
येथे युवकांना खेळाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी फुटबॉलचे मैदान, क्रिकेटचे मैदान, रनिंग ट्रॅक तसेच कबड्डी यासारख्या पारंपरिक खेळांसाठी मैदान उभारण्यात यावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. उर्वरित १५० एकर जागेवर भव्य उद्यान आणि वृक्षारोपण करण्यात यावे, यावरही त्यांनी भर दिला आहे. मुंबईत भविष्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर मोकळी जागा उपलब्ध होईल की नाही, हे निश्चित सांगता येणार नाही. त्यामुळे या संधीचा उपयोग करून विविध खेळाची मैदाने निर्माण करवीत, असे पत्रात त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com