हितेश मेहताला पोलिस कोठडी
हितेश मेहताला पोलिस कोठडी
न्यू इंडिया बँक गैरव्यवहार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी महाव्यवस्थापक हितेश मेहताला बँकेला १२२ कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी न्यायालयाने २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. मेहता कंपनीच्या माध्यमातून पैसे लुटण्यात त्याला मदत करणारा विकसक धर्मेश पौण यालाही अटक करण्यात आली असून, त्यालाही २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यात न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेत गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले. बँकेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कोणतेही नियम न पाळता कर्जवाटप केल्याचे आणि मोठ्या प्रमाणात व्याजदर लावल्याचे प्रकरण समोर आले. बँकेत १२२ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी आरोपी हितेश मेहताला पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवर्षी घोष यांनी शुक्रवारी दादर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये मेहता आणि इतरांवर निधीचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शनिवारी पहाटे गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. तक्रारीनुसार मेहता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या प्रभादेवी आणि गोरेगाव शाखांमधील तिजोरीतून १२२ कोटी रुपये हडप करण्याचा कट रचला. दादर आणि गोरेगाव शाखांचे पर्यवेक्षण करणारे मेहता यांच्यावर २०२० ते २०२५ दरम्यान फसवणूक करण्यासाठी त्यांच्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

