भारताला समुद्राखालील केबलने सिंगापूर-फ्रान्सशी जोडणार

भारताला समुद्राखालील केबलने सिंगापूर-फ्रान्सशी जोडणार
Published on

भारताला समुद्राखालील केबलने सिंगापूर-फ्रान्सशी जोडणार

मुंबई, ता. १८ : भारती एअरटेलने नुकत्याच समुद्राखाली टाकलेल्या २१,७०० रूट किलोमीटर लांबीच्या केबलमुळे भारताला सिंगापूर आणि फ्रान्स हे देश जोडले जातील व त्यामुळे भारतातील कनेक्टिव्हिटीत वाढ होईल. या केबलमार्फत आग्नेय आशिया, आखाती देश आणि युरोप हे मुंबई व चेन्नई याशहरांमार्फत जोडले जातील. या केबलचे काम एअरटेलची पुरवठादार कंपनी सबकॉमतर्फे नुकतेच पूर्ण करण्यात आले. यामुळे भारताच्या क्षमतेत २२० टीबीपी एवढी वाढ होईल. सध्या एअरटेलकडे ५० देशांमध्ये चार लाख रूट किलोमीटरचे नेटवर्क असल्याचे एअरटेलचे संचालक आणि सीईओ शरत सिन्हा यांनी सांगितले.
आग्नेय आशिया, मध्य पूर्वेतील देश आणि युरोप यांच्या केबल व्यवस्थेसाठीच्या मंडळातील एअरटेल हा प्रमुख भागीदार असून, त्याव्यतिरिक्त त्यांनी सिंगापूर, चेन्नई आणि मुंबई यांच्यात चार फायबर जोड्यांचे खासगी नेटवर्क उभारले आहे. एअरटेलचे जागतिक नेटवर्क पाच खंडात पसरले असून, जगभरातील ३४ केबल व्यवस्थेत त्यांची गुंतवणूक आहे. यात टू आफ्रिका, साउथ ईस्ट एशिया, जपान केबल टूचा समावेश आहे. त्याखेरीज युरोप इंडिया गेटवे, गल्फ ब्रिज इंटरनॅशनल, मिडील ईस्ट नॉर्थ आफ्रिका सबमरीन केबल या मोठ्या केबल यंत्रणेतही एअरटेलचा सहभाग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com