अदाणी व जेम्स एज्युकेशनची भागीदारी
अदाणी व जेम्स एज्युकेशनची भागीदारी
उच्च दर्जाच्या शाळेसाठी २,००० कोटींची देणगी
मुंबई, ता. १८ : देशभरात उच्च दर्जाच्या के १२ पद्धतीच्या शाळा उभारण्यासाठी अदाणी फाउंडेशनने या क्षेत्रातील जागतिक ख्याती प्राप्त जेम्स एज्युकेशनशी सहकार्य केले आहे. यासाठी अदाणी कुटुंबाने दोन हजार कोटी रुपयांची प्राथमिक देणगी दिली आहे.
लखनऊ येथे उभारणार पहिली शाळा
या भागीदारीतून संशोधन संस्थाही उभारण्यावर भर दिला जाईल. नवकल्पना आणि क्षमता वाढीमार्फत शैक्षणिक नैपुण्य उभारण्यावर या संशोधन संस्थांचा भर असेल. यामार्फत समाजाच्या सर्व स्तरांतील मुलांना परवडणारे जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यास प्राधान्य दिले जाईल. या मालिकेतील पहिली अदाणी जेम्स स्कूल ऑफ एक्सलन्स ही शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये लखनऊ येथे उभारली जाईल. त्यानंतर तीन वर्षांत अशा प्रकारच्या २० शाळा देशभरातील प्रमुख महानगरांत आणि त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या श्रेणीच्या शहरांमध्ये उभारल्या जातील. या शाळांमधील सीबीएसई अभ्यासक्रमाच्या ३० टक्के जागा निम्न उत्पन्न स्तरातील गुणी आणि गरजू मुलांसाठी नि:शुल्क राहतील.
सर्व स्तरावर मान्यता असलेले जागतिक दर्जाचे परवडणारे शिक्षण देण्याचे आमचे उद्दिष्टच या उपक्रमातून दिसून येते, असे अदाणी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदाणी म्हणाले. तर या भागीदारीतून जागतिक दर्जाच्या शिक्षण पद्धती आणि डिजिटल शिक्षणाच्या नवकल्पना स्वीकारून आम्ही आपल्या देशाचे जबाबदार नेते होण्यास पुढील पिढीला सज्ज करीत आहोत. कोणाचीही सामाजिक, आर्थिक पार्श्वभूमी कशीही असली तरी प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण सहजपणे मिळावे हे आमचे ध्येय आहे, असे जेम्स एज्युकेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष सनी वर्की म्हणाले.
शिक्षण क्षेत्रात मिळणार जागतिक दर्जाचे ज्ञान
या भागीदारीतून देशभरातील विद्यार्थ्यांसाठी परवडणाऱ्या सुनिश्चित आणि स्थायी अशा दर्जेदार शिक्षण व्यवस्थेचा आराखडा तयार केला जाईल. त्यामुळे आमचे शिक्षण क्षेत्रातील जागतिक दर्जाचे ज्ञान भारताच्या वेगवेगळ्या विभागांतील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मिळेल, असेही वर्की यांनी सांगितले. जागतिक अभ्यासक्रम आणि भारतातील सर्वोत्तम शिक्षण मंडळाच्या एकत्रीकरणातून अदाणी-जेम्स शाळांना फायदा होईल, असेही सांगितले जात आहे. साठ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या जेम्स एज्युकेशनच्या शाळांचे जाळे आठ देशांमध्ये असून, तेथे पावणेदोन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

