एसबीआय म्युच्युअल फंडाचा जननिवेश एसआयपी

एसबीआय म्युच्युअल फंडाचा जननिवेश एसआयपी

Published on

एसबीआय म्युच्युअल फंडाचा जननिवेश एसआयपी
मुंबई, ता. १८ : स्टेट बँक म्युच्युअल फंडाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहाय्याने अडीचशे रुपयांच्या जननिवेश एसआयपी योजनेची नुकतीच सुरुवात केली. सेबीच्या अध्यक्ष श्रीमती माधवी पुरी बूच आणि स्टेट बँकेचे अध्यक्ष चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांच्या उपस्थितीत या योजनेचे उद्घाटन झाले.
विविध श्रेणीतील गुंतवणूकदारांपर्यंत म्युच्युअल फंड अधिकाधिक प्रमाणात पोहोचवणे, हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. याद्वारे ग्रामीण, निमशहरी आणि शहरी भागातील छोट्या गुंतवणूकदारांना गुंतवणूक करणे सोपे होईल, अशी अपेक्षा आहे.

गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय
या २५० रुपयांच्या एसआयपीसाठीदेखील दैनिक, साप्ताहिक आणि मासिक असे गुंतवणुकीचे पर्याय असल्यामुळे गुंतवणूक अत्यंत सोपी आणि सुलभ झाली आहे. ही सुविधा एसबीआय योनो प्लॅटफॉर्म, पेटीएम ग्रो आणि झिरोदासारख्या अन्य फिनटेक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

प्रथमच आणलेल्या या अडीचशे रुपयांच्या एसआयपी योजनांमुळे प्रथमच गुंतवणूक करणाऱ्या व्यक्ती, असंघटित कामगार या योजनांकडे आकर्षित होतील, असे एसबीआय म्युच्युअल फंडाचे एमडी नंदकिशोर म्हणाले. संपत्ती निर्मिती आणि गुंतवणुकीचे सार्वत्रिकीकरण करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे, असे जॉइंट सीईओ डीपी सिंह म्हणाले. छोट्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांबरोबरच डिजिटल प्लॅटफॉर्मचा सहज वापर करणारे शहरी गुंतवणूकदार तसेच डिजिटलदृष्ट्या प्रगत गुंतवणूकदार यांना ही योजना अनुकूल असल्याचे सांगण्यात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com