नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ

नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ
Published on

मुंबई, ता. १८ : शहराच्या मध्यवर्ती असलेले रवींद्र नाट्यमंदिर आणि पु. ल. देशपांडे कला अकादमी नव्याने नाट्यरसिकांच्या सेवेत दाखल होत आहे. या संकुलांचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम शिवेंद्रराजे भोसले, मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार अनिल देसाई, आमदार महेश सावंत यांच्या उपस्थितीत २८ फेब्रुवारीला संध्याकाळी सहा वाजता होणार आहे.
मुंबईतील सुशोभित नाट्यगृह आणि अकादमीच्या उद्घाटनासाठी सर्व मुंबईकरांना येण्याचे आमंत्रण सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार यांनी पत्रकार परिषदेतून केले. पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या स्थापनेपासून अनेक कलाकार घडले आहेत. यापुढेही नवोदित कलाकारांमधील कलागुणांना प्रोत्साहन देण्याची सुविधा अकादमीमध्ये करण्यात आली आहे. त्याचबरोबर कला सादरीकरण, शिक्षण, आस्वादन, संवर्धन आणि कलाविषयक रोजगारनिर्मिती अशा बहुविध सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. कलाक्षेत्रातील २० वेगवेगळे प्रमाणपत्र, पदविका अभ्यासक्रम येथे सुरू होणार आहेत. या वेळी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नवीन बोधचिन्हाचेही अनावरण करण्यात आले.
-----------------------------
संकुलात अत्याधुनिक सुविधा
संकुलातील रवींद्र नाट्यमंदिर, दोन लघु नाट्यगृह आणि पाच प्रदर्शन दालने तसेच १५ तालीम दालने आहेत. त्याचबरोबर दोन्ही नाट्यगृहे नव्या रूपात, अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध आहेत. नाटक आणि मराठी चित्रपटांसाठी आवश्यक अशी अत्याधुनिक ध्वनी व्यवस्था व अंतर्गत सजावट करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com