बालकांच्या सुरक्षेसाठी निधीची तरतूद

बालकांच्या सुरक्षेसाठी निधीची तरतूद

Published on

मुंबई, ता. १७ : बालकांच्या सुरक्षेच्या योजनांसाठी निधी कमी पडू देणार नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा परिसरात दामिनी पथक नेमणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले. विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगामार्फत ‘बालरक्षा अभियानाचा’ शुभारंभ सह्याद्री अतिथिगृह येथे झाला.
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या जनजागृतीपर पोस्टरचे अनावरण, बालरक्षा अभियान प्रशिक्षण पुस्तिकेचे प्रकाशन, चिराग ॲपचे डिजिटल पद्धतीने अनावरण विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, प्रत्येक शाळेत नेमण्यात आलेल्या पालक-शिक्षण समितीचे ऑनलाइन मॉनिटरिंग करण्यात येणार आहे. मुलांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी त्यांचे समुपदेशन समवयस्क मुलांमार्फत झाल्यास नक्कीच प्रभावी ठरेल, असा विश्वास उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला, तर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी लहान बालकांच्या समस्यांबाबत तक्रारी नोंदवायच्या असतील, तर चिराग ॲपद्वारे नोंदवता येतील. या माध्यमातून ग्रामीण तसेच शहरी भागातील प्रत्येक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन आयोगास सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. शिक्षकांनाही प्रशिक्षण देण्यात येईल, सखी सावित्री समितीचा विस्तार करण्यात येणार आहे. पोक्सो कायद्यात अधिक कठोर तरतुदी करण्यात येणार असून, यासाठी सामाजिक संस्थांशी समन्वय साधणार असल्याचे भुसे म्हणाले.
-------------------------------
‘बालरक्षा अभियाना’निमित्त उपक्रम
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा यांनी आयोगामार्फत फेब्रुवारी २०२५ ते मार्च २०२५ दरम्यान होणाऱ्या ‘बालरक्षा अभियाना’बद्दल सविस्तर माहिती दिली. यामार्फत सुरक्षित व असुरक्षित स्पर्श, सखी सावित्री समिती या शासनाच्या नियमाची प्रभावी अंमलबजावणी, पोक्सो अधिनियम २०१२ मधील तरतुदी, सायबर सुरक्षितता, शिक्षक-शाळांसाठी मार्गदर्शक सूचना, शालेय बसद्वारे नियमित वाहतूक तसेच शालेय सहलीनिमित्त घ्यावयाची दक्षता यानिमित्त परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com