धारावीतील बांधकामे तात्‍काळ थांबवावीत!

धारावीतील बांधकामे तात्‍काळ थांबवावीत!

Published on

धारावीतील बांधकामे तत्‍काळ थांबवावीत!
२०२३ चे ड्रोन सर्वेक्षण आधारभूत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या अधिसूचित क्षेत्रात सुरू असलेली अनधिकृत बांधकामे तत्काळ थांबवावीत, असे धारावी पुनर्वसन प्रकल्पाने (डीआरपी) स्पष्ट करतानाच २०२३ साली धारावीत झालेल्या ड्रोन सर्वेक्षणालाच आधारभूत मानून सध्याच्या घरांची, झोपड्यांची ओळख पटवली जाणार आहे. तसेच मोकळ्या जागेची नोंद केली जाणार आहे. त्यामुळे या ड्रोन सर्वेक्षणानंतर झालेले कोणतेही नवीन बांधकाम किंवा बांधकामाचा विस्तार हे अनधिकृत मानले जाणार असल्याचे डीआरपीने स्पष्ट केले आहे.
धारावीतील अनधिकृत बांधकामांमध्ये नव्याने बांधलेले वरचे मजले, सुधारित झोपड्या आणि धारावी पुनर्विकास प्रकल्पात घरे मिळवण्यासाठी धारावीअंतर्गत परिसरातील कोणत्याही मोकळ्या जागेवर उभारलेली नवीन बांधकामे यांचा समावेश आहे. धारावी पुनर्वसन प्रकल्प (डीआरपी) आणि मुंबई महापालिका अशा बांधकामांवर संयुक्तपणे कारवाई करणार आहे. आवश्यकता भासल्यास, अशा झोपडीधारकांना पुनर्वसन पॅकेज आणि त्याच्यापासून मिळणाऱ्या लाभांपासून वंचित ठेवण्याचा डीआरपी गांभीर्याने विचार करेल, असे डीआरपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com