टीबी रुग्णांसाठी संजीवनी
(सूचना बातमी मुख्यला घेत आहे.)
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : टीबी रुग्णांच्या उपचारांत ‘बीपाल’ औषधाचा डोस महत्त्वाचा असतो. मुंबईतील जे. जे. रुग्णालयात ‘टीबी सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये नोंदणीकृत ११ रुग्णांना हा डोस देण्यात आला. त्यामुळे हा डोस देणारे जे. जे. रुग्णालय राज्यातील पहिले रुग्णालय ठरले आहे.
केंद्र सरकारने २०२५ पर्यंत देशातून क्षयरोगाचे उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी बीपालची मदत मिळणार आहे. तज्ज्ञांच्या मते क्षयरोगाने ग्रस्त रुग्णांपैकी १० टक्के रुग्ण एमडीआरचे असतात. यात मल्टी ड्रग्ज रेझिस्टंटमध्ये रुग्णांवर टीबीच्या काही औषधांचा परिणाम होत नाही. या रुग्णांना किमान २० ते २४ महिने औषधांवर घ्यावी लागतात, तर सहा महिने इंजेक्शन्स घ्यावी लागतात. हा दीर्घ डोस कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने बीपालला मान्यता दिली होती. त्याची सुरुवात जे. जे. रुग्णालयापासून करण्यात आली आहे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिलेल्या माहितीनुसार. रुग्णालयाच्या टीबी सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये नोंदणीकृत अशा १४ वर्षांवरील ११ एमडीआर रुग्णांना हा डोस देण्यात येत आहे.
----------------------------------------------------------
आता दहाऐवजी चारच औषधे
बीपाल ही एक बहुप्रतीक्षित उपचार प्रणाली अनेक देशांमध्ये सुरू आहे. तीन वर्षे चाललेल्या चाचणीत रुग्णांवर ९० टक्के सकारात्मक परिणाम दिसून आले. त्यानंतर भारतातही त्याला मान्यता देण्यात आली. याआधी एमडीआर रुग्णांना दररोज १० पेक्षा जास्त औषधे घ्यावी लागत होती, मात्र आता फक्त ४ औषधांचा कॉम्बो पॅक घ्यावा लागतो. यामध्ये पेटोमिड, लेव्हॅझोलिड, बेडाक्विलिन आणि मोक्सीफ्लॉक्सासिन गोळ्यांचा समावेश आहे.
़़़़़़ः---------------------------------------
दोन रुग्णालयांमध्ये चाचणी
आयसीएमआरच्या सूचनेनुसार, ऑगस्ट २०२१ मध्ये मुंबईतील पालिकेच्या गोवंडी येथील शताब्दी आणि घाटकोपरच्या सर्वोदय रुग्णालयात १०० रुग्णांवर क्लिनिकल चाचणी घेण्यात आली. सहा महिने औषधे दिल्यानंतर दोन वर्षे या रुग्णांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले. सर्व रुग्णांमध्ये सकारात्मक परिणाम आढळल्यानंतर बीपाल सुरू करण्याची शिफारस करण्यात आली.
------------------------------------------
पुढील महिन्यात राज्यभरात मोहीम
बालरोगतज्ज्ञांना २४ फेब्रुवारीपासून प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणानंतर राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एमडीआर टीबीने त्रस्त असलेल्या मुलांना मार्चपासून बीपाल डोस देण्यात येणार आहे. राज्यातील डॉक्टरांना प्रशिक्षण देण्याचे काम फेब्रुवारीत पूर्ण होणार असल्याचे राज्य क्षयरोग निर्मूलन अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

