केबीसी ग्लोबलचा १:१ बोनस शेअर

केबीसी ग्लोबलचा १:१ बोनस शेअर
Published on

केबीसी ग्लोबलचा १:१ बोनस शेअर
नाशिक, ता. १८ : बांधकाम व्यवसाय आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील नाशिकच्या केबीसी ग्लोबल लि.च्या संचालक मंडळाने १ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत १:१च्या प्रमाणात बोनस शेअर देण्यास मान्यता दिली. बोर्डाच्या मंजुरीनंतर ६० दिवसांच्या आत शेअर जमा होतील. बोनस शेअर पात्रतेसाठी रेकॉर्ड तारीख नंतर जाहीर केली जाईल. कंपनीकडे सध्या २६० कोटी रुपयांची कामे आहेत.
जून २०२४ मध्ये केबीसीने आपल्या सहाय्यक कंपनी कार्डा लि.च्या माध्यमातून पूर्व आफ्रिकेतील सीआरजेईकडून पायाभूत सुविधा विभागात २० दशलक्ष डॉलर्सची नागरी अभियांत्रिकी उपकंत्राटे मिळविली आहेत. अलीकडेच उपकंपनी केबीसी इन्फ्रास्ट्रक्चर लि., यूकेच्या घाना सहाय्यक कंपनीने लायबेरिया विशेष आर्थिक झोन प्राधिकरणाशी सामंजस्य करार केला आहे. कमी किमतीची घरे आणि अंदाजे १२ दशलक्ष डॉलर्सची किंमत असलेल्या सेझमधील व्यावसायिक जागेचा हा प्रकल्प आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com