महाराष्ट्रात धावणार उन्नत पॉडकार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये उन्नत पॉडकारचा प्रयोग राबवण्यात येणार आहे. वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यात ही प्रणाली महत्त्वाची भूमिका पार पाडेल, असे प्रतिपादन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. वडोदरा येथे पॉडकार प्रणालीचा त्यांनी आढावा घेतला.
‘मेक इन इंडिया’उपक्रमांतर्गत वडोदरा येथील स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये ‘स्वयंचलित पॉडकार उन्नत प्रणाली’ प्रायोगिक तत्त्वावर विकसित करण्यात येत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दाट घनता असलेल्या शहरात याचा वापर करण्याची चाचपणी करण्याच्या उद्देशाने सरनाईक यांनी या प्रकल्पाला भेट दिली. नुट्रान ईव्ही मोबिलिटी या कंपनीने फुट्रान प्रणालीवर आधारित ही वाहतूक व्यवस्था पुढील पिढीची नागरी वाहतूक प्रणाली ठरणार आहे. स्वयंचलित पॉडकार्स उन्नत ट्रॅकवर जोडल्या जातात. सध्याच्या रस्ते वाहतुकीमध्ये विनाअडथळा ही यंत्रणा उभारता येणार आहे.
---------------------------------------
दाट लोकसंख्येच्या भागांत उपयुक्त
एका पॉडकारमध्ये किमान २० प्रवासी बसू शकतात. ६० ते ७० किमी प्रतितास वेगाने ही कार प्रवास करते. ऑनबोर्ड इलेक्ट्रिक मोटर आणि बॅटरी सिस्टमवर या कार्यरत राहतात. विशेष म्हणजे, रस्त्यांवरील कमीत कमी जागेचा वापर करून दाट लोकसंख्येच्या भागात ही सेवा उपयुक्त ठरू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

