पालिका कामगारांचा आझाद मैदानावर मोर्चा
मुंबई, ता. १८ ः मुंबई महापालिकेत कार्यरत कामगारांच्या विविध मागण्यांसाठी म्युनिसिपल मजदूर युनियनच्या वतीने मंगळवारी आझाद मैदानात आज मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात विविध खात्यांमध्ये काम करणारे कामगार, कर्मचारी, अभियंते, परिचारिका सहभागी झाले होते.
महापालिकेच्या निधीची होणारी उधळपट्टी थांबवून कामगार, कर्मचारी, अभियंते, परिचारिका, तंत्रज्ञ, शिक्षक, सुरक्षा रक्षक यांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवा, भांडवली कामाच्या नावाखाली मुंबई महापालिकेची होत असलेली उधळपट्टी थांबवा, महापालिकेमध्ये काम करणाऱ्या २९,६१८ कामगारांना राज्य शासनाच्या धोरणाप्रमाणे मालकी हक्काची घरे देण्यात यावी, घाणीचा संबंध येणाऱ्या आणि घाणकाम भत्ता मिळणाऱ्या खात्यातील कामगारांना लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार न्यायालयाने ८ जानेवारी २०२५ रोजी दिलेल्या निर्णयाची तंतोतंत अंमलबजावणी करून कामगारांच्या वारसांना त्वरित नोकऱ्या द्याव्यात, विविध खात्यांमध्ये पदोन्नतीची तसेच रिक्त असलेली पदे त्वरित भरण्यात यावीत, आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

