हितेश मेहताची लाय डिटेक्टर चाचणी
मुंबई, ता. १८ ः न्यू इंडिया बँकेचे माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता १२२ कोटींच्या अपहाराबाबत खोटी तसेच अपूर्ण माहिती देत आहेत. त्यामुळे नेमकी माहिती मिळविण्यासाठी त्यांची लाय डिटेक्टर चाचणी करावी, या निष्कर्षावर आर्थिक गुन्हे विभाग आले असून तसा विनंती अर्ज न्यायालयात केला जाण्याची शक्यता आहे.
गोरेगाव, प्रभादेवी शाखेतील १२२ कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोपाखाली मेहता आर्थिक गुन्हे शाखेच्या कोठडीत आहेत.चौकशीदरम्यान मेहता यांनी बँकेच्या बांधकाम व्यवसायिक धर्मेश पौन याला ७० तर उन्ननाथन अरुणाचलम ऊर्फ अरुणभाई या व्यक्तीला ४० कोटी रुपये टप्प्या टप्प्याने दिल्याचे सांगितले होते. पण उर्वरित रक्कमेपैकी काही त्यांनी वैयक्तिक कारणांसाठी खर्च केली. तर काही रक्कम त्यांनी व्याजी फिरविल्याचा संशय आहे. या माहितीआधारे आर्थिक गुन्हे शाखेने पौण आणि अरुण यांना अटक केली. पौण याने हा आरोप फेटाळताना मेहता यांनी १२ ते १३ कोटी रुपये दिल्याचे सांगितले. तर अरुण याने ४० नव्हे तर ५० कोटी रुपये मेहता यांच्याकडून मिळाल्याचे तपासातून स्पष्ट होत आहे. पण मेहता यांनी बँकेतून चोरलेल्या १२२ कोटी रुपयांची विल्हेवाट कशी लावली, याची नेमकी माहिती मिळविण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडून लाय डिटेक्टर चाचणीची परवानगी न्यायालयाकडे मागितली जाऊ शकते. पण चाचणीची परवानगी न्यायालयासोबत मेहता यांच्यावरही अवलंबून असेल. त्यांनी मागणीस विरोध केल्यास या चाचणीची आवश्यकता आर्थिक गुन्हे शाखेला न्यायालयास पटवून द्यावी लागेल.
-------------------------------------
कोणाचेच लक्ष कसे गेले नाही
आर्थिक अनियमिततेमुळे बँकेच्या कारभारावर रिझर्व्ह बँकेची देखरेख होती. २०२१ पासून महिन्याचा, वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल रिझर्व्ह बँकेकडून तपासला जात होता. प्रत्येक वर्षी तोट्याचा ताळेबंद सादर होऊनही बँकेतील अन्य वरिष्ठ अधिकारी आणि रिझर्व्ह बँकेचे लक्ष त्याकडे कसे गेले नाही. बँकेकडे सुमारे १३० कोटी रुपये कॅश इन हॅण्ड होती. त्यातील तब्बल १२२ कोटी रुपये एका शाखेतून बाहेर पडले, पण ते दुसऱ्या शाखेत पोचलेच नाहीत, याकडे कोणाचेच लक्ष का वेधले गेले नाही, याबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे.
-------------------------------------
बँकेच्या सीईओकडे चौकशी
आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी प्रभादेवी शाखेत उपस्थित बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू भोवन यांच्याकडे चौकशी केली. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, एमबीएचे शिक्षण घेतलेले भोवन काही वर्षांपूर्वी ते बँकेच्या आयटी विभागात कार्यरत होते. तेथून त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्त करण्यात आले. बँकिंग क्षेत्राचा विशेष अनुभव नसलेल्या भोवन यांना इतकी मोठी जबाबदारी दिल्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच मंगळवारी केलेल्या चौकशीत त्यांना बँक कारभाराविषयी फारसे ज्ञान नसल्याचे अधिकाऱ्यांना दिसून आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

