दिल्लीतील संमेलनात मराठी साहित्याचा गजर

दिल्लीतील संमेलनात मराठी साहित्याचा गजर

Published on

दिल्लीतील संमेलनात मराठी साहित्याचा गजर
७० प्रकाशकांचा सहभाग; १०६ स्टॉलवर पुस्तकांची विक्री
संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा
नवी दिल्ली, ता. १९ : सरहद संस्थेच्या वतीने आयोजित ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राजधानी दिल्ली सज्ज झाली आहे. २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या या संमेलनात ७० हून अधिक नामांकित प्रकाशक संस्था सहभागी होत आहेत. देशातील विविध शासकीय, अशासकीय तसेच खासगी वितरक संस्थांचे एकूण १०६ स्टॉल लागणार असून, यानिमित्त दिल्लीत मराठी साहित्याचा गजर होणार आहे.
मागील वर्षी अमळनेर येथे झालेल्या ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पुस्तकांची पुरेशी विक्री न झाल्याने अनेक प्रकाशन संस्थांचे भाडेही वसूल झाले नव्हते. त्यामुळे त्यांनी नाराजीही व्यक्त केली होती. त्या वेळी प्रकाशकांना भेडसावलेल्या अडचणी आणि समस्यांची दखल घेत अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि सरहद संस्थेने पुस्तक तसेच अन्य साहित्य विक्रीच्या स्टॉलबाबत योग्य नियोजन केले आहे. प्रत्येक स्टॉलच्या प्रतिनिधींना दिल्लीत राहण्यासह इतरही सवलती देण्यात आल्याने केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर देशभरातून अनेक प्रकाशन संस्थांनी या संमेलनात स्टॉल लावले आहेत. त्यामुळे संमेलन राज्याबाहेर असूनही स्टॉलची संख्या वाढली आहे. यंदा पुस्तक विक्रीला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे या संमेलनात अनेक नामवंत साहित्यिकांच्या पुस्तकांचे प्रकाशनही होणार असल्याचे सांगण्यात आले.
--
दिल्लीतील संमेलनात ७० प्रकाशक सहभागी झाले असून, पुस्तक व साहित्य विक्रीचे १०६ स्टॉल लावले जाणार आहेत. राज्य व देशभरातील नामांकित प्रकाशन संस्‍थांमध्ये मराठी प्रकाशकांची संख्या लक्षणीय आहे. स्टॉलसाठी यंदा माफक भाडे आकारले असून, स्टॉलसोबत एका व्यक्तीच्या राहण्याचीही सुविधा केली आहे. तसेच अन्य सेवा-सुविधाही उपलब्ध केल्या आहेत.
- राजीव बर्वे, अध्यक्ष, अखिल भारतीय प्रकाशक संघ
--
दिल्लीत ७१ वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्यानिमित्त दिल्लीकरांना मराठी साहित्य, ग्रंथसंपदा खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या संमेलनात विविध कार्यक्रमांसह पुस्तकविक्रीला दिल्लीकरांसह मराठी साहित्यप्रेमींचा मोठा प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. यंदा स्टॉलची संख्या वाढली असून, विविध प्रकाशकांची अनेक पुस्तके उपलब्ध होणार आहेत.
- प्रा. उषा तांबे, अध्यक्षा, अ. भा. म. सा. महामंडळ
------------------------
फोटो -
MUM25-E78974


MUM25-E78972

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com