७४० कोटींच्या प्रकल्पाबाबत ‘आर्केड’चा करार
७४० कोटींच्या प्रकल्पाबाबत ‘आर्केड’चा करार
मुंबई, ता. १९ : मालाड पश्चिम येथील नूतन आयोजन सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या पुनर्विकासाचे हक्क आर्केड डेव्हलपर्सने मिळवले असून, साडेसहा हजार चौरस मीटर क्षेत्रफळावरील या प्रकल्पातून कंपनीला ७४० कोटी रुपयांचे ढोबळ विकास मूल्य मिळण्याची अपेक्षा आहे.
पुनर्विकास प्रकल्पात दोन लाख ३३ हजार चौरस फूट एवढा विक्रीयोग्य रेरा कार्पेट एरिया आहे. येथे दोन व तीन बीएचकेची घरे उभारली जातील. यात दोन बेसमेंट, चार पोडियम लेव्हल पार्किंग आणि ३२ निवासी मजले असतील. या प्रकल्पात ४०८ घरे उभारली जातील. त्यातली अंदाजे २१५ घरे ही विक्रीयोग्य असतील, असे कंपनीचे एमडी आणि व्यवस्थापकीय संचालक अमित जैन यांनी सांगितले. मुंबईकर रहिवाशांना आलिशान राहणीमानाची आणि अत्याधुनिक सुखसोयींची अपेक्षा असते. त्या अपेक्षांनुसारच हा प्रकल्प उभारण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

