महर्षी कर्वे रोड सहा तास बंद

महर्षी कर्वे रोड सहा तास बंद

Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, १९ : पश्चिम रेल्वे प्रशासनमार्फत एम. के. रोड ते वानखेडे स्टेडियमला जाणाऱ्या पादचारी पुलांचे तोडकाम करण्यात येणार आहे. हे पूल हटवण्याकरिता महर्षी कर्वे रोडवरील दक्षिण वाहिनी व उत्तर वाहिनी ही सहा तास वाहतुकीकरिता बंद केली जाणार आहे. शुक्रवारी (ता. २१) रात्री ११ ते शनिवारी (ता. २२) पहाटे पाच वाजेपर्यंत निष्कासनाचे काम केले जाणार आहे. यादरम्यान महर्षी कर्वे रोडच्या दोन्ही वाहिन्या आणि अहिल्याबाई होळकर मार्ग (चर्चगेट जंक्शन) ते आनंदीलाल पोतदार चौक हा मार्ग वाहतुकीकरिता बंद राहणार आहे. या काळात कुलाबा, कफपरेड (दक्षिण मुंबई)कडून पूर्व मुंबई व मध्य मुंबई, उत्तर मुंबई विमानतळाकडे जाणारी वाहतूक वीर नरीमन रोडने एम. जी. रोड, आनंदीलाल पोतदार जंक्शन मार्गाने उजवे वळण घेत एम. के. रोडने मार्गस्थ करण्यात येणार आहे. तसेच मध्य व पूर्व मुंबईकडून कुलाबा, कफ परेडकडे जाणाऱ्या वाहनांना एम. के. रोडवरील एस. एल. डागा चौक (आनंदीलाल पोतदार चौक) येथून डावे वळण घेत एम. जी. रोड, वीर नरीमन रोडने मार्गस्थ व्हावे लागेल, असे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com