मोतीलाल ओसवाल अल्टरनेटची मेगाफाईन फार्मा मध्ये गुंतवणूक!

मोतीलाल ओसवाल अल्टरनेटची मेगाफाईन फार्मा मध्ये गुंतवणूक!

Published on

मोतीलाल ओसवाल अल्टरनेटची मेगाफाइन फार्मामध्ये गुंतवणूक
मुंबई, ता. २५ : मोतीलाल ओसवाल अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्सने मेगाफाइन फार्मा प्रा. लि.मध्ये ४६० कोटी रुपये गुंतवण्याचे मान्य केले आहे. संस्थापक प्रवर्तक असलेल्या संघवी कुटुंबानेदेखील या व्यवहारात सहभागी होऊन कंपनीतील आपला वाटा वाढवण्याचे ठरवले आहे, असे मेगाफाइनचे संस्थापक एमडी शैलेश संघवी म्हणाले.
मेगाफाइन ही निर्यातीवर भर देणारी मुंबईची कंपनी असून त्यांच्या नाशिक आणि वापी येथील उत्पादन प्रकल्पांना अमेरिकी एफडीएची मान्यता आहे. ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स निर्माण करण्यात या कंपनीचा हातखंडा आहे. कंपनीतर्फे ही उत्पादने स्वतःसाठी तसेच कंत्राटी स्वरूपातही अन्य कंपन्यांना दिली जाते. कंपनीचे जगातील प्रमुख औषधनिर्मिती कंपन्यांशी सहकार्य असून काही प्रमुख औषध निर्मितीत त्यांनी जागतिक बाजारपेठेतील प्रमुख वाटा उचलला आहे, असे मोतीलाल ओसवालचे एमडी रोहित मंत्री म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com