सीबीआयचे नांदेड, पुणे, कोल्हापूरसह देशभर छापे
सीबीआयचे नांदेड, पुणे, कोल्हापूरसह देशभर छापे
गेन बिटकॉइन घोटाळा; डिजिटल पुरावे हाती लागल्याचा दावा
मुंबई, ता. २५ : गेन बिटकॉइन घोटाळ्याचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मंगळवारी (ता. २५) नांदेड, पुणे, कोल्हापूरसह देशभरातील सुमारे ६० ठिकाणी एकाचवेळी छापे मारून शोधाशोध केली. या कारवाईत महत्त्वाचे डिजिटल पुरावे हाती लागल्याचा दावा विभागाच्या प्रवक्त्याने केला आहे.
आभासी चलनात (बिटकॉइन) गुंतवणूक केल्यास महिन्याला १० टक्के परतावा देण्यात येईल, असे प्रलोभन दाखवत अमित भारद्वाज (मृत) आणि अजय भारद्वाज यांनी २०१५ मध्ये देशभर एजंटचे जाळे नेमून विविध फसव्या योजना बाजारात आणल्या. हळूहळू या योजनांनी बहुस्तरीय स्वरूप धारण केले. सुरुवातीचा काही काळ प्रस्तावित परतावा मिळाल्याने देशभरात या योजनांचा गाजावाजा झाला आणि गुंतवणूकदारांची संख्या झपाट्याने वाढली; मात्र दोनच वर्षांत कंपनीने परतावा देणे बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, पंजाब, चंडीगड, मध्य प्रदेश, कर्नाटक, दिल्ली, प. बंगाल आदी राज्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल झाले होते.
सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
देशभर पसरलेला तपासाचा परीघ लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने गेन बिटकॉइन घोटाळ्याची सर्व प्रकरणे सीबीआयकडे सोपवली आणि त्यांचा एकत्रित तपास करण्याचे आदेश दिले होते; या घोटाळ्यातील पसार आरोपींचा शोध, घोटाळ्यातील रक्कम, त्याचा विनियोग, आंतरराष्ट्रीय व्यवहार तपासण्यासाठी मंगळवारी (ता. २५) सीबीआय पथकांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने नांदेड, पुणे, कोल्हापूरसह, दिल्ली एनसीआर, चंडीगड, बंगळूर आणि अन्य ठिकाणी छापे घातल्याचे सीबीआयकडून सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

