वाहनचालकांसाठी अपघातविमा उपयुक्त
वाहनचालकांसाठी अपघातविमा उपयुक्त
रिलायन्स इन्शुरन्सचे राकेश जैन यांची माहिती
मुंबई, ता. २६ : वाहन मालकांनी वाहन विम्याबरोबरच वैयक्तिक अपघात विमा काढणेही अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे अपघातग्रस्त वाहनमालक-चालकाला आर्थिक मदत तर मिळतेच; पण त्याचप्रमाणे आपत्कालीन परिस्थितीत विविध मदतसेवा मिळाल्याने जीव वाचविण्यासही मदत होते, असे मत रिलायन्स जनरल इन्शुरन्सचे सीईओ राकेश जैन यांनी मांडले आहे. भारतात रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यू आणि जखमींचे वाढते प्रमाण रस्ते सुरक्षेसाठी गंभीर अवस्थेत गेले आहे, असेही ते म्हणाले.
सर्वसाधारण वाहन विम्याअंतर्गत अपघातात वाहनाचे झालेले नुकसान आणि इतरांच्या नुकसानीसाठी विमाछत्र मिळते; पण वैयक्तिक अपघात विम्यामुळे वाहन मालकाला संरक्षण मिळते. यामुळे अपघातानंतर वैद्यकीय खर्च, कायमस्वरूपी अपंगत्वासाठी नुकसानभरपाई आणि वाहन मालकाचा मृत्यू झाल्यास वारसांना किंवा नामनिर्देशित व्यक्तींना साहाय्य मिळते. त्यामुळे वाहनमालकांनी सर्वसाधारण वाहनविमा आणि वैयक्तिक अपघातविमा जरूर काढावा, असेही जैन यांनी सांगितले.
रस्ते अपघातात मृत्यू आणि जखमींच्या संख्येत वाढ
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, जगातील एकूण वाहनांच्या केवळ एक टक्केच वाहने भारतात आहेत; पण जागतिक स्तरावरील रस्ते अपघातांमधील मृत्यूंपैकी ११ टक्के मृत्यू भारतात होतात. मागील वर्षाच्या तुलनेत अपघातांमध्ये ११.९ टक्के, अपघाती मृत्यूंमध्ये ९.४ टक्के आणि जखमींच्या संख्येत १५.३ टक्के वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

