होंडा एलीव्‍हेटची मोटारींची विक्रमी विक्री

होंडा एलीव्‍हेटची मोटारींची विक्रमी विक्री
Published on

होंडा एलिव्‍हेट मोटारींची विक्रमी विक्री
मुंबई, ता. २६ : होंडा कार्स इंडिया लि.ने जागतिक एसयूव्‍ही मॉडेल होंडा एलिव्‍हेटच्‍या एकूण एक लाख मोटारींच्या विक्रीचा टप्‍पा पार केला आहे. होंडा एलिव्‍हेट ही मोटार देशांतर्गत, तसेच आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठेत अत्‍यंत यशस्‍वी ठरली आहे. कंपनीने भारतात एलिव्‍हेटच्‍या एकूण ५३ हजार ३२६ मोटारींची विक्री केली आहे आणि जानेवारी २०२५पर्यंत जपान, दक्षिण आफ्रिका, नेपाळ व भूतान येथे ४७ हजार ६५३ मोटारी निर्यात केल्या आहेत. २०२३ मध्‍ये होंडा एलिव्‍हेटच्‍या निर्यातींना सुरुवात झाल्‍यापासून या कारने कंपनीला निर्यात व्‍यवसायात आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्‍ये ६५ टक्‍के वाढ मिळवून दिली आहे आणि या आर्थिक वर्षातील निर्यात व्यवसाय ९२ टक्‍क्‍यांहून जास्त वाढला आहे, असे होंडा कार्स इंडिया लि.चे मार्केटिंग अँड सेल्‍सचे उपाध्‍यक्ष कुणाल बहल म्‍हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com