गेन बिटकॉईनबाबत अनेक पुरावे हाती

गेन बिटकॉईनबाबत अनेक पुरावे हाती

Published on

गेन बिटकॉइनबाबत अनेक पुरावे हाती
सीबीआयचा दावा

मुंबई, ता. २६ ः गेन बिटकॉइन घोटाळ्याप्रकरणी गेले दोन दिवस देशभर छापे घालणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सुमारे २४ कोटी रुपयांचे आभासी चलन आणि अन्य महत्त्वाचे डिजिटल व कागदोपत्री पुरावे हाती लागल्याचा दावा बुधवारी (ता. २६) केला.
देशभर पाळेमुळे असलेल्या या घोटाळ्याच्या तपासासाठी सीबीआयने मंगळवार, बुधवारी नांदेड, पुणे, कोल्हापूरसह देशभरातील सुमारे ६० ठिकाणांवर एकाच वेळी छापे मारून शोधाशोध सुरू केली होती. या कारवाईत २४ कोटींच्या आभासी चलनासह १२१ कागदपत्रे, अनेक क्रिप्टो वॉलेट हार्डवेअर, ३४ लॅपटॉप, १२ मोबाइल फोन, ईमेल आयडी आणि मेसेज करण्यासाठी वापरण्यात येणारी ॲप असे साहित्य जप्त करण्यात आले, असे सीबीआय प्रवक्त्याने सांगितले. आभासी चलनात (बिटकॉइन) गुंतवणूक केल्यास महिन्याला १० टक्के परतावा देण्यात येईल, असे प्रलोभन दाखवत अमित भारद्वाज (मृत) आणि अजय भारद्वाज यांनी २०१५मध्ये देशभर एजंट नेमून विविध फसव्या योजना बाजारात आणल्या. दोन वर्षांत या योजना बंद पडू लागल्या. ठेवीदारांना परतावा मिळणे बंद होताच महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, पंजाब, चंदिगढ, मध्य प्रदेश, कर्नाटक, दिल्ली, प. बंगाल आदी राज्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याचा एकत्रित तपास सीबीआयकडून सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com