वृद्धाचे अपहरणकर्ते अटकेत

वृद्धाचे अपहरणकर्ते अटकेत

Published on

वृद्धाचे अपहरणकर्ते अटकेत
मुंबई : वृद्ध व्यापाऱ्याचे अपहरण करत २५ लाखांची खंडणी मागणाऱ्या त्रिकुटास बुधवारी (ता. २६) वाकोला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. केशवजी चौधरी (६०) असे या व्यापाऱ्याचे नाव असून, ते सांताक्रूझ परिसरात राहतात. सोनवारी (ता. २४) ते गुजरातहून भूज एक्सप्रेसने मुंबईत येत होते. प्रवासादरम्यान काही व्यक्तींनी त्यांना अपहृत केले आणि कुटुंबीयांकडे २५ लाखांची खंडणी मागितली. कुटुंबाने पोलिस तक्रार करताच तपास सुरू झाला. तांत्रिक तपासाआधारे पोलिसांनी राधेश्याम सोनी (आयुर्वेदिक औषध विक्री), सतीश यादव (विमा सल्लागार) आणि धर्मेंद्र रविदास (खासगी सुरक्षा रक्षक) यांना अटक करत वृद्धाची सहिसलामत सुटका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com