

सायन पुलाजवळ नव्या पादचारी पुलाची तयारी
पालिकेच्या जागेच्या प्रतीक्षेत रेल्वेचे काम रखडले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मध्य रेल्वेने सायन पुलाचा रेल्वे रुळांवरील भाग हटवला असून, पादचाऱ्यांसाठी ५६ मीटर लांबीचा नवीन पादचारी पूल उभारण्याची योजना आखली आहे. हा पूल सध्याच्या पुलाच्या कल्याण बाजूच्या टोकाला बांधला जाणार आहे; मात्र धारावी दिशेला उतरणाऱ्या जिन्यांसाठी आवश्यक जागा नसल्याने काम रखडले आहे. ही जागा पालिकेने मोकळी करून द्यावी, अशी रेल्वेची मागणी आहे.
सायन पूल बंद झाल्याने पूर्व-पश्चिम जोडणी तुटली आहे. त्यामुळे धारावी आणि एलबीएस मार्गावर ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी हा पूल मोठी सुविधा ठरणार आहे. ५६ मीटर लांब आणि तीन मीटर रुंद असलेल्या या पुलाच्या बांधकामासाठी रेल्वेने सर्व तयारी पूर्ण केली आहे; मात्र पुलाच्या धारावी बाजूला पालिकेच्या जागेत इमारत असल्याने जिने उभारणे शक्य नाही. ही १२० चौ. मीटर जागा पालिकेने भाडेतत्त्वावर दिली असून ती इमारत हटवल्यानंतरच पुलाच्या कामास गती मिळेल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पर्यायी मार्गांचा वापर
सायन पूल हटवण्याच्या दिवसापासून ३० महिन्यांत नवीन पूल तयार करण्याचे उद्दिष्ट होते; मात्र आठ महिने उलटले तरी पालिकेचे पाडकाम न झाल्याने प्रकल्प रखडला आहे. त्यामुळे नागरिकांना अजूनही पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.