प्रमाणपत्राच्या दोषासाठी वेळेपूर्वीच कार्यवाही

प्रमाणपत्राच्या दोषासाठी वेळेपूर्वीच कार्यवाही

Published on

प्रमाणपत्राच्या दोषासाठी वेळेपूर्वीच कार्यवाही
युवासेनेच्या मागणीनंतर मुंबई विद्यापीठाचे स्पष्टीकरण
मुंबई, ता. ४ : मुंबई विद्यापीठाच्या बोधचिन्हात एका इंग्रजी अक्षराची झालेली चूक मागील १५ दिवसांपूर्वीच विद्यापीठाने लक्षात घेतली होती. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र देण्यात आले, ते परत मागवून नव्याने सुधारित प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आले. ती प्रक्रिया सुरू असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. यासंदर्भात सोमवारी (ता. ४) युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी कुलगुरूंची भेट घेत झालेली चूक लक्षात आणून दिली होती.
विद्यापीठाने झालेल्या चुकीवर ज्या विद्यार्थ्यांनी एबीसी आयडी तयार केले होते, फक्त त्याच विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र तयार करण्यात आले. जे विद्यार्थी पदवी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाला उपस्थित होते, अशा विद्यार्थ्यांना ते वितरित झाले. ही संख्या खूप कमी आहे. ज्या विद्यार्थ्यांचे एबीसी आयडी तयार झाले, अशा सर्व विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र हे डिजिलॉकरमध्ये उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि सत्यता पडताळणीसाठी आवश्यक यंत्रणा सुलभरित्या उपलब्ध आहे. यासंदर्भात योग्य ती कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.
-----------------------------
पुन्हा पदवी वितरण समारंभ
ज्या महाविद्यालयांनी पदवी वितरण सोहळा आयोजित केला, अशा सर्व महाविद्यालयांकडून प्रमाणपत्र विद्यापीठास परत करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या होत्या. सुधारित पदवी प्रमाणपत्रानुसार महाविद्यालयांनी पदवी वितरण समारंभ आयोजित करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
-------------------------------------
विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य
दरम्यान, भविष्यात अशा चुका होऊ नयेत, यासाठी छपाई प्रक्रियेत अधिक काटेकोर गुणवत्ता तपासणीचे उपाय राबवले जाणार आहेत. मुंबई विद्यापीठ आपल्या विद्यार्थ्यांच्या हितास सर्वोच्च प्राधान्य देत असून, त्यांना कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागू नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचेही विद्यापीठाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com