मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडला पालिकेची नोटीस
मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडला पालिकेची नोटीस
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : सहार गावातील टर्मिनल दोनजवळील रस्त्यावरील वृक्षांच्या बुंध्याभोवती कॉँक्रीटीकरण करण्यात आले आहे. याविरोधात पालिकेच्या के पश्चिम विभागातील उद्यान विभागाने मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडला नोटीस बजावली आहे.
वॉचडॉग फाउंडेशनचे प्रमुख गॉडफ्रे पिमेंटा यांच्या तक्रारीनंतर के पश्चिम कार्यालयातील अधिकाऱ्याने संंबंधित ठिकाणी पाहणी केली असता येथील वृक्षांभोवती कॉँक्रीटीकरण केल्याचे निदर्शनास आले. परिणामी, येथील वृक्ष भविष्यात मृत होण्याची शक्यता आहे. याची गंभीर दखल घेत केलेले काँक्रीटीकरण ताबडतोब काढून वृक्षांभोवती १०१ मीटर जागा सोडून वृक्षांभोवती लाल मातीचा भराव करण्याचे निर्देश देण्यात आले, अन्यथा संबंधितांवर महाराष्ट्र (नागरी) वृक्ष संवर्धन व जतन अधिनियम १९७५ अन्वये कठोर कारवाई करण्याचा इशारा उद्यान विभागाचे प्रमुख जितेंद्र परदेशी यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

