गोवंडीत तेरा वर्षांच्या मुलाची भररस्त्यात हत्या

गोवंडीत तेरा वर्षांच्या मुलाची भररस्त्यात हत्या

Published on

गोवंडीत तेरा वर्षांच्या मुलाची भररस्त्यात हत्या

मुंबई : बहिणीची छेड काढणाऱ्यास जाब विचारणे १३ वर्षांच्या मुर्तुझा शेख उर्फ नवाज या मुलाच्या जीवावर बेतले. छेड काढणाऱ्या सैयब अली या तरुणाने नवाजची भररस्त्यात हत्या केली. हा धक्कादायक प्रकार शनिवारी (ता.१) रात्री नऊच्या सुमारास गोवंडीच्या झाकीर हुसेन नगरात घडला. याप्रकरणी आरोपी सैयब अलीविरोधात देवनार पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नवाजच्या बहिणीने आरोपी सैयबने छेड काढल्याची तक्रार गेल्या आठवड्यात पालकांकडे केली होती. तिचे पालक सैयबच्या घरी जाब विचारण्यासाठी गेले; मात्र तो घरी न सापडल्याने नवाजचे कुटुंबीय आपल्या घरी परतले. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास नवाजने सैयबला गाठून जाब विचारला. तिथे वाद झाला आणि सैयबने नवाजला जोरात दगडावर आपटले आणि त्याच्या चेहऱ्यावर लाथा घातल्या. या हल्ल्यात नवाज गंभीर जखमी झाला. त्याला शताब्दी रुग्णालयात दाखल केले गेले, तेथे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com