मित्राने अल्पवयीन तरुणीला जाळले
मित्राने अल्पवयीन तरुणीला जाळले
मुंबई, ता. ४ : दुर्लक्ष करीत असल्याचा समज करून घेत एका तरुणाने अल्पवयीन मुलीच्या अंगावर पेट्रोल शिंपडत तिला पेटवून दिले. अंधेरी परिसरात रविवारी (ता. २) रात्री घडलेल्या या प्रकारात पीडिता तब्बल ७० टक्के भाजली तर आरोपी तरुणही किरकोळ भाजला. या दोघांवर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तरुणाविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. दरम्यान, मंगळवारी (ता. ४) या तरुणीची प्रकृती चिंताजनक होती, असे पोलिसांनी सांगितले. जखमी तरुणी आणि आरोपी तरुणाची मैत्री होती, ते नियमितपणे भेटत होते; मात्र अलीकडेच त्यांच्या भेटींबाबत तरुणीच्या पालकांना समजले. त्यांनी विचारणा केली तेव्हा प्रेमसंबंध नाहीत, असे तरुणीने स्पष्ट केले. त्यानंतर पालकांच्या भीतीने तिने तरुणास भेटणे कमी केले, फोनवरील बोलणे कमी केले. त्याचा राग अनावर होऊन तरुणाने हे कृत्य केले. घटना घडली तेव्हा तरुणी आपल्या मैत्रिणीच्या घरी गेली होती, तेथून परतताना तरुणाने तिला गाठल्याचे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

