‘वंदे भारत’ला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

‘वंदे भारत’ला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Published on

‘वंदे भारत’ला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : मुंबई-गोवा मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला दिवसागणिक उत्तम प्रतिसाद मिळत असून प्रवाशांची संख्याही वेगाने वाढत आहे. मध्य रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांत एकूण ५० हजार ७३९ प्रवाशांनी या ट्रेनमधून प्रवास केला आहे. वेगवान, सुरक्षित आणि अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या ट्रेनला प्रवासी आणि पर्यटकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २७ जून २०२३ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्‍घाटन करण्यात आले होते. त्यानंतर २८ जूनपासून ही सेमी-हायस्पीड ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. पहिल्याच फेरीत या ट्रेनच्या ५३३ आसन क्षमतेपैकी ४७७ आसने भरली होती; प्रारंभी ९१.४४ ते ९३.११ टक्के क्षमतेने धावणाऱ्या या ट्रेनला सध्या ९५ टक्के प्रतिसाद मिळत आहे. या ट्रेनला सध्या आठ डबे असून प्रवाशांसाठी आरामदायी आसने, वेगवान सेवा आणि आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत रेल्वे मंत्रालयाने वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती केली असून ती किफायतशीर दरात उपलब्ध आहे. सध्या मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी-सोलापूर, सीएसएमटी-शिर्डी, सीएसएमटी-जालना आणि सीएसएमटी-मडगाव या वंदे भारत गाड्या धावत आहेत. या सर्व गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत असून सुरक्षित आणि वेगवान प्रवासासाठी प्रवासी समाधान व्यक्त करीत आहेत.

सीएसएमटी-मडगाव प्रवासी आकडेवारी
फेब्रुवारी - १३,१९६ प्रवासी
मार्च - ११,६१४ प्रवासी
..
एकूण २४,८१० प्रवासी

मडगाव-सीएसएमटी प्रवासी आकडेवारी
फेब्रुवारी - १३,२४५ प्रवासी
मार्च - १२,६८४ प्रवासी
..
एकूण - २५,९२९ प्रवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com