नागपाड्यात चार कामगारांचा गुदमरून गुदमरून मृत्यू

नागपाड्यात चार कामगारांचा गुदमरून गुदमरून मृत्यू

Published on

नागपाड्यात चार कामगारांचा गुदमरून मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : नागपाडा येथे निर्माणाधीन इमारतीच्या पाण्याच्या टाकीची सफाई करण्यासाठी टाकीत उतरलेल्या चार कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्‍याची घटना रविवारी (ता. ९) दुपारी घडली. टाकीत उतरलेल्या पाच कामगारांना तत्काळ टाकीतून बाहेर काढून नजीकच्या जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी पाचपैकी चार जणांना मृत घोषित केले, तर एका कामगारावर उपचार सुरू आहेत.

नागपाडा, मिंट रोड, गुड लक मोटर ट्रेनिंग स्कूलजवळ बिस्मिल्लाह स्पेस बिल्डिंग येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीची सफाई करण्यासाठी रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पाच कामगार उतरले होते; मात्र साफसफाई काम करताना टाकीत निर्माण झालेल्या विषारी वायूमुळे या कामगांराचा श्वास गुदमरला. त्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. याबाबत काहीशा उशिराने माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान, स्थानिक पोलिस हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत टाकीत उतरलेल्या पाच कामगारांना बाहेर काढून नजीकच्या जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. येथील डॉक्टरांनी हस्पिल शेख (वय १९), राजा शेख (वय २०), जियाउल्ला शेख (वय ३६) आणि इमांदू शेख (वय ३८) या चार कामगारांना मृत घोषित केले; तर पुरहान शेख (वय ३१) या कामगारावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे नागपाडा परिसरात एकच खळबळ उडाली असून, स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलाचे संबंधित अधिकारी या घटनेची सखोल चौकशी करीत आहेत. दरम्यान, इमारत मालक, मुकादम यांची चौकशी सुरू असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com