मुंबईत एप्रिलमध्ये ''एलईडी एक्स्पो''

मुंबईत एप्रिलमध्ये ''एलईडी एक्स्पो''

Published on

मुंबईत एप्रिलमध्ये ‘एलईडी एक्स्पो’
मुंबई, ता. ९ : विविध नवकल्पनांसह उदयास येत असलेल्या रोषणाई/लाइट उद्योगाचे प्रदर्शन एलईडी एक्स्पो मुंबई, याचे येत्या ३ ते ५ एप्रिल यादरम्यान बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, मुंबई येथे होणार आहे. ‘मेस्से फ्रँकफर्ट ट्रेड फेअर्स इंडिया’द्वारे त्याचे आयोजन केले जाणार आहे. ‘एलईडी एक्स्पो मुंबई’ हे या क्षेत्राचे भारतातील एकमेव समर्पित व्यासपीठ असून, त्यात रोषणाईशी संबंधित सर्व गोष्टींचा समावेश आहे. सदर एलईडी एक्स्पोमध्ये २०० हून अधिक प्रदर्शकांच्या सहा हजारांहून अधिक उत्पादनांची पर्वणी मिळणार आहे.
‘एलईडी एक्स्पो मुंबई’मध्ये एलईडी रोषणाईच्या विविध प्रकार/उपायांचे एक अनोखे मिश्रण प्रदर्शित केले जाईल. हे मिश्रण केवळ रोषणाई उद्योगातच नाही, तर स्मार्ट लाइट्स, डिझाइन आणि सजावटीसाठी एलईडी, वातावरणीय रोषणाई एलईडी आणि प्रकाश उपयोजनांमध्ये नवीन संकल्पनांना अधोरेखित करेल. भारतातील पायाभूत सुविधा क्षेत्रात उल्लेखनीय वाढ झाली आहे. त्यामुळे एलईडी लाइटिंग उद्योगासाठी नवनवीन मार्ग खुले झाले आहेत, असे ‘मेस्से फ्रँकफर्ट एशिया होल्डिंग्ज लिमिटेड’चे कार्यकारी संचालक राज मानेक यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com