दोन कंत्राटदारांना अटक

दोन कंत्राटदारांना अटक

Published on

दोन कंत्राटदारांना अटक
चार मजुरांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांची कारवाई
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० ः नागपाडा येथे निर्माणाधीन इमारतीच्या पाण्याच्या टाकीची इमारत साफ करताना गुदमरून चार कामगारांचा रविवारी (ता. ९) मृत्यू झाला होता. या प्रकरणी जे.जे. मार्ग पोलिसांनी अब्दुल शेख आणि अनिमेश बिस्वास या दोन कंत्राटदारांना रविवारी मध्यरात्री अटक केली. दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
नागपाडा येथे पुनर्विकास प्रकल्पातून एका बहुमजली इमारतीचे काम निर्बाण इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.तर्फे सुरू आहे. रविवारी दुपारी इमारतीच्या तळघरात काही महिन्यांपासून बंद असलेल्या पाण्याच्या टाकीत पाच कामगार बेशुद्धावस्थेत आढळले. अग्निशमन दलाने त्यांना टाकीबाहेर काढून उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी चार मजुरांचा मृत्यू झाला, तर एका मजुरावर उपचार सुरू आहे. या प्रकरणी जे.जे. मार्ग पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद घेत चौकशी सुरू केली. प्राथमिक चौकशीत पाण्याच्या टाकीचा स्लॅब बांधताना वापरलेल्या लाकडी फळ्या काढण्यासाठी हे कामगार टाकीत उतरले होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली; मात्र त्यांच्या सुरक्षेसाठी विकसक कंपनी आणि कंत्राटदाराकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून पोलिसांनी कंत्राटदारांवर कामगारांच्या सुरक्षेबाबत निष्काळजीपणा दाखविल्याबद्दल गुन्हा नोंदविला होता.
---
परस्पर उतरवले टाकीत
विकसकाने शेख आणि बिस्वास यांना बांधकामासाठी कामगार पुरविण्यास अधिकृत संमती दिली होती; मात्र या दोघांनी कामगार पुरवून विकसक कंपनीला न कळविता चौघांना पाण्याच्या टाकीत उतरवले, अशी माहिती तपासातून पुढे आल्याने त्यांना अटक करण्यात आल्याचे जे.जे. मार्ग पोलिसांनी सोमवारी न्यायालयाला सांगितले.
----
विकसकाचीही चौकशी?
दरम्यान, या प्रकल्पात पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या बिस्वासच्या विरोधात यापूर्वीही अशाच प्रकारचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे काम देण्यापूर्वी कंत्राटदारांची पार्श्वभूमी तपासली होती का, याबाबत विकसक कंपनीकडे पोलिस चौकशी करण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com