चेंबूरमध्ये तरुणाची हत्या

चेंबूरमध्ये तरुणाची हत्या

Published on

चेंबूरमध्ये तरुणाची हत्या
मुंबई, ता. १० ः चेंबूरच्या वडवली गाव परिसरात पूर्ववैमनस्यातून रविवारी मध्यरात्री विघ्नेश चांगले (वय २१) या तरुणाची हत्या करण्यात आली, तर मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या त्याच्या भावावरही धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी विविध पथके तयार करून आठ संशयितांना ताब्यात घेतले.
काही दिवसांपूर्वी विघ्नेशचा वडवली गाव परिसरातीलच काही तरुणांसोबत वाद होता. रविवारी मध्यरात्री घरी परतताना या तरुणांची टोळी त्याठिकाणी मद्यपान करीत होता. विघ्नेश समोर येताच त्याच्याशी वाद घालत हाणामारी सुरू झाली. त्यात विघ्नेशवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. त्याला वाचविण्यासाठी त्याचा भावाने मदत करण्याचा प्रयत्न केला असता, त्याच्यावरही वार करण्यात आले. त्यानंतर मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com