शासकीय नोकरीसाठी ३० लाख उकळून पोबारा

शासकीय नोकरीसाठी 
३० लाख उकळून पोबारा
Published on

शासकीय नोकरीसाठी
३० लाख उकळून पोबारा
मुंबई, ता. १० : सरकारी नोकरीचे प्रलोभन दाखवून एका व्यावसायिकाला ३० लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या उत्तर प्रदेशच्या तरुणाविरोधात वडाळा पोलिसांनी रविवारी गुन्हा नोंदवला. सुंदरकुमार दुबे असे या तरुणाचे नाव आहे. विविध राज्यांतील आयपीएस, आयएएस अधिकाऱ्यांसह राजकीय पुढाऱ्यांसोबतची छायाचित्रे दाखवून त्याने अनेकांना फसविल्याचा संशय पोलिसांनी व्‍यक्त केला आहे.

याप्रकरणी कपड्यांचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाने तक्रारी केली आहे. आरोपी हा व्यावसायिकाच्या शेजारी राहणाऱ्या दुबे कुटुंबीयांचा नातेवाईक आहे. तो दुबे यांच्याकडे अधूनमधून येत असे. त्यातून ओळख झाली होती. दुबे याच्या प्रलोभनांना बळी पडून व्यावसायिकाने दोन मुलांच्या सरकारी नोकरीसाठी आरोपींकडे शब्द टाकला. तेव्‍हा आरोपीने भारतीय रेल्वेसह विविध शासकीय विभागांमध्ये नोकरीच्या संधी असून, त्यासाठी ३० लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले. व्यावसायिकानेही टप्प्या-टप्प्याने ही रक्कम आरोपीला दिली. त्यानंतर या आरोपीने पोबारा करून संपर्क तोडला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्यावसायिकाने तक्रार केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com