राज्यात अभिजात मराठी भाषा सप्ताह

राज्यात अभिजात मराठी भाषा सप्ताह

Published on

राज्यात अभिजात मराठी भाषा सप्ताह
रिद्धपूर येथे अनुवाद अकादमी स्थापणार
मुंबई, ता. १० : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकाककडून प्रत्येक वर्षी ३ ते ९ ऑक्टोबर या कालावधीदरम्यान अभिजात भाषा सप्ताह साजरा केला जाणार आहे. त्यासोबत मराठी विद्यापीठ असलेल्या रिद्धपूर येथे इतर भाषांतील साहित्यांसोबत प्राकृत, संस्कृत आदी भाषेतील साहित्यासाठीचे पहिली अनुवाद अकादमी स्थाप‍ित केली जाणार आहे.
अर्थमंत्री अजित पवार यांनी आज मांडलेल्या अर्थसंकल्पात मराठी भाषा विकासासाठी भरीव तरतूद जाहीर केली. यात २०२५-२६ या वर्षांसाठी मराठी भाषा विभागाला २२५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ, राज्य साहित्य संस्कृती मंडळ, राज्य मराठी विकास संस्था आदींच्या विविध उपक्रमांसाठीच्या निधीसाठी ही तरतूद आहे. मराठी भाषेसाठी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून अभिजात मराठी भाषाविषयक उपक्रम राबविले जाणार आहेत. यासोबत मराठी भाषेच्या संशोधनातील उल्लेखनीय कार्यासाठी पुरस्कारही सुरू केले जाणार आहेत.
--
कोट
अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्याचा खर्च केंद्र सरकार देणार आहे का, अभिजात मराठी भाषा संशोधन केंद्र स्थापन करण्याची तरतूद ही केंद्राच्या योजनेचा भाग आहे, केंद्राने त्यासाठी निधी दिला का, नसल्यास तो खर्च केंद्राच्या वतीने महाराष्ट्र सरकार स्वतःच कसा काय करणार, मग केंद्र दर्जा देऊन नेमके करणार काय आहे, अभिजात दर्जा योजनेचा खर्च महाराष्ट्र सरकारने करण्याचे कोणतेच कारण नाही, केंद्राची योजना आहे. त्यांचे लाभ केंद्राने द्यायला हवेत.
- डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, माजी अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com