नेपाळ दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना सव्वा कोटींची मदत वितरित
नेपाळ दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना
सव्वा कोटींची मदत वितरित
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : काठमांडू येथे देवदर्शनासाठी चाललेल्या भाविकांची बस दरीत कोसळून जळगावच्या २५ जणांचा मृत्यू झाला होता. या मृतांच्या नातेवाइकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून सव्वा कोटींची मदत वितरीत करण्यात आली आहे, अशी माहिती कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.
नेपाळमधील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांच्या कुटुंबीयांसोबत राज्य सरकार उभे असून, मदतनिधी म्हणून पाच लाख रुपयांची घोषणा राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. या वचनाची पूर्तता म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांना १२ मार्च २०२५ रोजी प्रत्येकी पाच लाख अशाप्रकारे २५ कुटुंबीयांना एक कोटी २५ लाख रुपयांची मदत वितरित केली आहे, असे नाईक यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

