

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत लवकरच कृती आराखडा
परिवहन मंत्री सरनाईक यांची हमी
मुंबई, ता. १२ ः एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळावा यासाठी लवकरात लवकर कृती आराखडा तयार करू, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत दिली.
भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांच्या प्रश्नावर सरनाईक यांनी ही माहिती दिली. एसटी कर्मचाऱ्यांना ठरलेल्या तारखेला पगार मिळावा यासाठी राज्य सरकार कृती आराखडा तयार करणार का, एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देणार का, असे प्रश्न दरेकर यांनी केले होते. परिणय फुके यांनी राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली रक्कम भविष्य निर्वाह निधी विश्वस्त मंडळामध्ये जमा केली नसल्याबाबत प्रश्न उपस्थित केला. या चर्चेत सहभाग घेत दरेकर यांनी वरील प्रश्न विचारले. त्यावर मंत्र्यांनी सकारात्मक उत्तर दिले.
...
वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई
राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत अनियमितता करणाऱ्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी विनंती प्रवीण दरेकर यांनी सभागृहात प्रश्नोत्तराच्या चर्चेवेळी सरकारकडे केली. त्यांच्या या विनंतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महिन्यात चौकशी पूर्ण करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे सकारात्मक उत्तर दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.