दिवाणी प्रकरणात ३६ लाख उकळले

दिवाणी प्रकरणात 
३६ लाख उकळले
Published on

दिवाणी प्रकरणात
३६ लाख उकळले

वकील असल्याचे भासवणाऱ्या महिलेवर गुन्हा

मुंबई, ता. १२ : प्रभादेवी येथील मालमत्तेवरून कुटुंबात सुरू असलेला वाद मिटवण्याच्या निमित्ताने ३६ लाख रुपये उकळणाऱ्या महिलेविरोधात भोईवाडा पोलिसांनी मंगळवारी गुन्हा नोंदवला.
कुटुंबाने दिलेल्या तक्रारीनुसार या महिलेने वकील असल्याचे भासवले होते. तसेच वरपर्यंत ओळखी असून हा वाद चुटकीसरशी मिटवते, असा दावा केला होता. प्रत्यक्षात ही महिला वकील नसून गरजू नागरिकांची फसवणूक करणारी सराईत गुन्हेगार असावी, असा संशय तक्रारदार कुटुंबाने व्यक्त केला. या महिलेने चार वर्षांत तक्रारदार कुटुंबीय आणि त्यांच्या आप्तेष्टांकडून तब्बल ३६ लाख रुपये या ना त्या निमित्ताने उकळले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी सखोल चौकशी, तपास केल्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे भोईवाडा पोलिसांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com