कांदळवनाच्या प्रतिबंधित क्षेत्रात शाळा

कांदळवनाच्या प्रतिबंधित क्षेत्रात शाळा

Published on

कांदळवनाच्या प्रतिबंधित क्षेत्रात शाळा

मालकवर्गाविरोधात गुन्हा नोंद

मुंबई, ता. १२ : ट्रॉम्बे येथील चिता कॅम्प परिसरातील कांदळवनात (बफरझोन) २५ वर्षांपासून एक शाळा बेकायदा बांधल्याचा शोध अलीकडेच तहसीलदार कार्यालयास लागला. ही शाळा शासकीय मिळकतीवर आणि कांदळवनाच्या प्रतिबंधित क्षेत्रात उभी असल्याची खात्री होताच तहसीलदार कार्यालयाने पोलिस तक्रार केली आहे. त्याआधारे ट्रॉम्बे पोलिसांनी या शाळेची मालकी असलेल्या पाच व्यक्तींविरोधात वन्य संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा नोंदवला.

छोटा कॅम्प येथील महसुली आणि कांदळवन क्षेत्रात ग्लोरियस नावाची शाळा बेकायदा उभी असल्याची तक्रार अयाज खान नावाच्या व्यक्तीने तहसीलदार कार्यालयात केली होती. त्याआधारे संयुक्त पाहणी केली गेली. उपलब्ध दस्त, नोंदीवरून शाळा उभी असलेला भूभाग ही शासकीय मिळकत असून कांदळवन प्रतिबंधित क्षेत्र असल्याचे स्पष्ट झाले. तहसीलदार कार्यालयाने पोलिसांच्या मदतीने या शाळेचे मालक सुगंधा जॉर्ज, एस. एडिसन, पडना राजन, अब्राहम चेलादुरी आणि एस. ख्रिस्तोफर यांची ओळख पटवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com