मुंबई सेंट्रल आगाराचे काँक्रिटीकरण पूर्ण
मुंबई सेंट्रल आगाराचे काँक्रीटीकरण पूर्ण
एसटी फेऱ्या सोमवारपासून होणार सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : मुंबई सेंट्रल एसटी आगारातील काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाल्याने मुंबई विभागातील मुंबई आगारात समाप्त होणाऱ्या फेऱ्या सोमवारपासून (ता. १७) पूर्ववत सुरू केल्या जाणार आहेत.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) निधीतून एसटीच्या राज्यभरातील १८३ बस स्थानक परिसराचे काँक्रीटीकरणाचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी ६०० कोटी रुपये एमआयडीसीमार्फत खर्च करण्यात येणार आहेत. सद्यःस्थितीत राज्यातील अनेक स्थानकांचे काम सुरू झाले असून, आता महाराष्ट्र वाहतूक भवन असलेल्या मुंबई सेंट्रल बस स्थानकाचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. यामुळे स्थानकातून सुटणाऱ्या आणि स्थानकात समाप्त होणाऱ्या बसफेऱ्या परळ, दादर, कुर्ला नेहरूनगर स्थानकांत वळवण्यात आल्या. राज्यातील विविध जिल्ह्यांतून येणाऱ्या बसगाड्यांचा शेवटचा थांबा परळ, कुर्ला नेहरूनगर ठेवण्यात आला होता. त्याच स्थानकातून संबंधित बसगाड्यांचा परतीचा प्रवास सुरू केला जात होता; मात्र मुंबई सेंट्रल आगारातील काम पूर्ण झाल्याने आता फेऱ्या पूर्ववत होणार आहेत. मुंबई आगार व बस स्थानक परिसरात काँक्रीटीकरणाचे काम सुरू होणार असल्याने मुंबई आगारात समाप्त होणाऱ्या फेऱ्या २३ डिसेंबर २०२४पासून पुढील आदेशापर्यंत खंडित करण्यात आल्या होत्या. आता काम पूर्ण झाले असल्याने १७ मार्च २०२५ पासून फेऱ्या पूर्ववत सुरू करण्यात याव्यात, अशा सूचना विभाग नियंत्रकांनी दिल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

