अदाणी इलेक्ट्रिसिटीला गोल्ड एचआर एक्सलन्स अवॉर्ड
अदाणी इलेक्ट्रिसिटीला गोल्ड एचआर एक्सलन्स अवॉर्ड
मुंबई, ता. १७ : अदाणी इलेक्ट्रिसिटीला अमेरिकेतील ब्रॅंडन हॉल एच आर एक्सलन्स गोल्ड अवॉर्ड २०२४ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे. कंपनीला त्यांच्या अदाणी मार्व्हल्स लीडरशिप उपक्रमासाठी बेस्ट लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम गटात हा पुरस्कार मिळाला. त्यायोगे कर्मचाऱ्यांचा सतत विकास करण्याच्या आणि नेतृत्वगुण विकसित करण्याच्या कंपनीच्या निर्धाराला मान्यता मिळाल्याचे दाखवून दिले जात आहे.
फ्लोरिडामध्ये झालेल्या ब्रॅंडन हॉल एक्सलन्स कॉन्फरन्सदरम्यान अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लि.चे मुख्य मनुष्यबळ संसाधन अधिकारी डॉ. संजीव मुरमकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. संस्थेच्या दीर्घकालीन वाढीसाठी एक वर्षाचा ‘ए मार्व्हल्स’ हा कार्यक्रम तयार करण्यात आला असून, त्याद्वारे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये पुढील काळातील नेतृत्वगुणांसाठी कौशल्य आणि दूरदृष्टी विकसित केले जातात. यात वेगवेगळे शिकवणी वर्ग, वैयक्तिक प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव यांच्या साह्याने योग्य नेतृत्वगुण तयार केले जातात. या क्षेत्रातील नवकल्पना, आराखडा, कल्पकता, तंत्रज्ञानाचा वापर तसेच त्याचे दिसणारे फलित आणि कर्मचाऱ्यांचा फायदा जाणून घेण्यासाठी त्यांनी व्यक्त केलेली मते, या आधारे या पुरस्कारासाठी मूल्यमापन केले जाते. अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या या कार्यक्रमामुळे त्यांच्या उत्पादकतेवर तसेच कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर आणि त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित होण्यावर चांगला परिणाम झाल्याचे आढळून आले, असे अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

