तोंडी तलाक देणाऱ्याविरुद्ध गुन्हा

तोंडी तलाक 
देणाऱ्याविरुद्ध गुन्हा
Published on

तोंडी तलाक
देणाऱ्याविरुद्ध गुन्हा
मुंबई ः हुंड्यासाठी विवाहितेचा मानसिक, शारीरिक छळ करणाऱ्या आणि परदेशातून फोनद्वारे तोंडी तलाक देणाऱ्या पतीसह सासू, नणंदेविरोधात ट्रॉम्बे पोलिसांनी गुन्हा नोंदवत कारवाई सुरू केली आहे.
हिना दिवेकर (वय २९) या विवाहितेच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. हिना आणि अदनान (वय ३४) यांचा डिसेंबर २०२२ मध्ये विवाह झाला. लग्नात हिनाच्या वडिलांनी २५ हजार रुपये रोख रकमेसह दागिने आणि गृहोपयोगी वस्तू अदनानला दिल्या होत्या. २०२३ मध्ये अदनान कामानिमित्त दुबईला निघून गेला. तिथून तो सतत हुंड्याची मागणी करू लागला. येथे सासू आणि नणंद सतत टोमणे, शिवीगाळ, मारहाण करते. अखेर गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अदनानने फोनवरून शिवीगाळ करीत तोंडी तलाक दिला. फेब्रुवारी महिन्यात तो घरी परतला असता, मला घराबाहेर काढल्याची तक्रार हिनाने पोलिसांत केली. त्यावरून अदनान, त्याची आई आणि बहिणीविरोधात गुन्हा नोंदवल्याचे ट्रॉम्बे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com