गुढीपाडव्यापासून वाहनांवरील सामाजिक संदेश मराठीतून

गुढीपाडव्यापासून वाहनांवरील सामाजिक संदेश मराठीतून

Published on

गुढीपाडव्यापासून वाहनांवरील सामाजिक संदेश मराठीतून
परिवहनमंत्र्यांचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : येत्या गुढीपाडव्यापासून मराठी नववर्ष सुरू होत आहे. या दिवसापासून राज्यामध्ये परिवहन विभागामार्फत नोंदणी झालेल्या प्रत्येक व्यावसायिक वाहनावर लिहिले गेलेले सामाजिक संदेश हे मराठीत असले पाहिजेत, असे निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिले आहेत.
मंत्री सरनाईक म्हणाले, की महाराष्ट्र राज्याची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. महाराष्ट्रातील नागरिक हे प्रामुख्याने मराठी भाषिक आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. साहजिकच मराठी भाषेचे संवर्धन करणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे. तथापि, राज्यात नोंदणी असलेल्या अनेक व्यावसायिक वाहनांवर सामाजिक संदेश, जाहिरात आणि प्रबोधनात्मक माहिती हिंदीत किंवा इतर भाषांमध्ये लिहिलेले असतात (उदा. बेटी बचाव... बेटी पढाव). त्यामुळे मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारावर बंधने येतात. यापुढे असे सामाजिक संदेश, जाहिरात व प्रबोधनात्मक माहिती मराठी भाषेत प्रदर्शित केल्यास (उदा. मुलगी वाचवा... मुलगी शिकवा!) मराठी भाषेचा प्रचार व प्रसार होईल. तसेच मराठी भाषेचा योग्य सन्मान राखला जाईल. त्यासाठी येत्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्र राज्यात नोंदणीकृत असलेल्या सर्व व्यावसायिक वाहनांवरील सामाजिक संदेश, तसेच इतर महत्त्वाच्या जाहिराती व प्रबोधनात्मक माहिती मराठी भाषेत लिहिण्याची अंमलबजावणी सुरू करावी, असे निर्देश परिवहन आयुक्त यांना दिल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com