ऑनलाईन भेटलेल्या बाबाने दहा लाखांना लुबाडले

ऑनलाईन भेटलेल्या बाबाने दहा लाखांना लुबाडले

Published on

ऑनलाइन भेटलेल्या बाबाने दहा लाखांना लुबाडले
तणावमुक्तीचा उपाय पडला महाग

मुंबई, ता. २५ ः वैयक्तिक, व्यावसायिक आयुष्यातील अडचणींमुळे निर्माण झालेला ताण दूर करण्यासाठी एका ऑनलाइन बाबाचे मार्गदर्शन आणि उपाय २५ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणास महागात पडले. डिव्हाईन ॲपवर भेटलेल्या ‘बडे बाबा’ने आयुष्यात स्थिरता आणण्यासाठी आभासी पूजा मांडत या तरुणाकडून तब्बल १० लाख उकळले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या तरुणाने सायबर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. या उच्च शिक्षित तरुणाची कहाणी ऐकून पोलिसांनीही कपाळावर हात मारला. तूर्तास पोलिसांनी गुन्हा नोंदवत अनोळखी बाबाचा शोध सुरू केला आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीतून निसटण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळेल, या विश्वासाने तक्रारदार तरुणाने डिव्हाईन टॉक ॲपचा वापर सुरू केला. या ॲपवर ओळख झालेल्या एका बाबाने पूजा करावी लागेल, त्यासाठी १५ हजार खर्च अपेक्षित आहे, असे सांगितले. ही रक्कम अदा केल्यावर आणखी काही विधी केल्यास सर्व अडचणी दूर होतील, असे सांगत २८ हजार रुपयांची मागणी केली. तरुणाने त्यास नकार देताच पूजा अर्धवट सोडल्यास तुझा मृत्यू होईल, शिवाय तीन ब्राह्मणांनाही जीव गमवावा लागेल, यासह निरनिराळी कारणे देत ऑनलाइन बाबा पैसे मागत गेला आणि तक्रारदार तरुण पैसे देत गेला. तब्बल १० लाख रुपये दिल्यावरही ऑनलाइन बाबाकडून पैशांची मागणी थांबेना तेव्हा तरुणाने मित्रांकडे हात पसरले. कारण सांगताच सर्वांनी त्याला वेड्यात काढले. ही फसवणूक असल्याचे त्याला पटवून दिले. त्यानंतर त्याने तक्रार दिली. त्याआधारे गुन्हा नोंदवल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com