धारावी आग प्रकरणी पोलिसांची कारवाई
धारावी आगप्रकरणी पोलिसांची कारवाई
अवैध पार्क केलेल्या वाहनचालक-मालकांसह पार्किंग माफियांविरोधात गुन्हा
मुंबई, ता. २५ : धारावी आग प्रकरणात पोलिसांनी मंगळवारी (ता. २५) ज्वलनशील वायू भरलेली वाहने रस्त्याकडेला अवैधरीत्या पार्क करणाऱ्या चालक, मालकांसह परिसरातील पार्किंग माफियाविरोधात गुन्हा नोंदवत कारवाई सुरू केली.
आग लागलेला ट्रक एचपी कंपनीचा एलपीजी वाहून नेत होता. ट्रकमध्ये गॅस भरलेले सिलिंडर असूनही चालकाने अवैधरीत्या व आग लागल्यास जीवितहानी होईल, अशा ठिकाणी उभा केला होता. या ट्रकसोबत गॅस, शिधावाटप विभागाचे तांदूळ भरलेले आणि अन्य वाहनांच्या चालक, मालक वर्गास या गुन्ह्यांत आरोपी करण्यात आल्याचे पोलिस उपआयुक्त गणेश गावडे यांनी स्पष्ट केले. यासोबत धारावी येथील निसर्ग उद्यान परिसरात अवैधरीत्या पे पार्क चालविणाऱ्या माफियांनाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. या पदपथाशेजारी, नो पार्किंग क्षेत्रात शासनाची परवानगी नसताना दिवसाचे, तासांचे पैसे आकारून वाहने पार्क करून घेतात. त्यांनी करून घेतलेल्या डबल पार्किंगमुळे रहदारीस अडथळा होत होता; शिवाय ज्वलनशील पदार्थ, वायू भरलेली वाहनेही या परिसरात नियमित उभी केली जात होती, अशी माहिती पोलिसांना प्राथमिक तपासात मिळाल्याचे समजते. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास याठिकाणी गॅस सिलिंडरने भरलेल्या ट्रकला आग लागल्यानंतर त्यातील सुमारे २० सिलिंडरचा स्फोट झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

