‘विकसित भारत’ कामराचे नवे विडंबन गीत

‘विकसित भारत’ कामराचे नवे विडंबन गीत

Published on

‘विकसित भारत’ कामराचे नवे विडंबन गीत

मुंबई, ता. २५ ः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचल्यानंतर मंगळवारी (ता. २५) स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने एक्सद्वारे जारी केलेल्या नव्या गाण्याने आगीत तेल पडण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या ‘विकसित भारत’ या कार्यक्रमाची खिल्ली या गाण्यातून उडविण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या विडंबन गीतादरम्यान शिवसैनिकांनी रविवारी खार येथील हॉटेलमध्ये घातलेला धुडगूस, देशभर त्याच्याविरोधात झालेली निदर्शने याची छायाचित्रे जोडण्यात आली आहेत. आधीच्या विडंबन गीताप्रमाणे हेही क्षणात सर्वदूर पसरले असून त्याचे पडसाद देशभर उमटण्याची शक्यता आहे.
...
पोलिसांकडे मागितली मुदत
कुणाल कामराविरोधात गुन्हा दखल केल्यानंतर खार पोलिसांनी समन्स बजावत त्याला चौकशीस हजर राहण्याबाबत सूचित केले. हे समन्स त्याच्या वडिलांनी स्वीकारले. तसेच, वकिलांमार्फत कुणाल याने खार पोलिसांकडे एक आठवड्याची मुदत मागितली आहे; मात्र पोलिसांनी ती मान्य केलेली नसून दुसरे समन्स जारी केले जाईल, असे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com